patan 
सातारा

डाकेवाडीत तरुणाईने केले वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा

तळमावले (जि. सातारा) ः कोरोनाच्या संकटामुळे पुणे, मुंबईतील चाकरमानी सध्या गावाकडे आहेत. या लॉकडाउनचा चांगला उपयोग पाटण तालुक्‍यातील डाकेवाडीतील (काळगाव) तरुणांनी केला. शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या तरुणांनी शाळेच्या आवारामध्ये 35 रोपे लावली आहेत. 

या भागात सध्या खरीप पेरणीची धांदल सुरू आहे. या धांदलीमधून वेळ काढत येथील तरुणांनी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले आहे. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे आपण काही तरी देणे लागतो ही भावना या तरुणांमध्ये होती. त्यांनी मुख्याध्यापक महादेव गेजगे, रणजित शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेच्या आवारामध्ये सुमारे 35 रोपे लावली. चाफा, जास्वंद, तुती, पिंपळ अशा विविध जातींच्या रोपांचा त्यात समावेश आहे. 

यापूर्वी लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे काम करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ सुंदर गुणवत्तापूर्ण उपक्रमशील स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या रंगरंगोटीमध्ये शिवछत्रपती प्रतिष्ठानचा मोलाचा वाटा आहे. पाटणचे गटशिक्षणाधिकारी नितीन जगताप यांनी प्रत्यक्ष भेट देत शाळेचे कौतुक केले आहे. 

शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी या शाळेतील 60 मुलांना बॅग वाटप, शाळेला संगणक भेट, तसेच शाळा रंगवण्यासाठी मदत केली आहे. वृक्षारोपणप्रसंगी विकास डाकवे, विकास जाधव, रवींद्र डाकवे, रमेश जाधव, राजेंद्र डाकवे, संतोष डाकवे, कृष्णा डाकवे, प्रदीप जाधव, कृष्णा चिचुलकर, अनिल चिंचुलकर व प्रतिष्ठानचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवछत्रपती प्रतिष्ठानने राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. 


लॉकडाउनचा कालावधीत गावातील तरुणांनी वृक्षारोपणाचा राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सर्वोतोपरी प्रयत्न करतात. शाळेच्या प्रगतीच्या वाटचालीत डाकेवाडी ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग आहे. सर्वांच्या प्रयत्नामुळेच शाळेचे रूप पालटले आहे. 

- महादेव गेजगे, मुख्याध्यापक, डाकेवाडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT