Satara SAkal
सातारा

सातारा : युवकांच्या फसवणूकप्रकरणी दोघांना कोठडी; पोलिसांनी मुंबईतून घेतलं ताब्यात

चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने ठोठावल्याची माहिती पोलिसांनी दिली

गजानन गिरी

मसूर : ट्रेंडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यावर तिप्पट फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मसूर व उंब्रज येथील युवकांना ४२ लाख ३६ हजारांना गंडा घातल्याची तक्रार येथील पोलिसांत दाखल झाली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी तपास करून सुनील नवीनचंद्र रूबाला (वय ३२, रा. याजू पार्कजवळ विरार) व यशवंत विजय नारायण यादव (वय ३०, रा. आकुर्डी रोड, हनुमाननगर, कांदिवली, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने ठोठावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांची माहिती अशी, अभिषेक चंद्रशेखर वेल्हाळ (रा. मसूर) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये त्यांना एक जानेवारी २०२१ मध्ये वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून ट्रिनिटी एफएक्स व एफएक्स या ट्रेंडिंग माहिती सांगण्यात आली. त्यांनी त्यांचे कंपनीचे अकाउंट नंबर फोनवर पाठवले. वेळोवेळी पैशाची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामध्ये गुंतवलेले पैसे दोन महिन्यांमध्ये तिप्पट होतील, असे सांगितले. म्हणून मी १ जानेवारी ते ३१ जुलै २०२१ पर्यंत २१ लाख ९१ हजार ३६० रुपये पाठवले. त्याचबरोबर माझे मित्र सचिन प्रकाश जगदाळे, आनंदा सदाशिव जगदाळे, मोहन प्रकाश जगदाळे (सर्व रा. मसूर), दिग्विजय पांडुरंग मराठे (रा. उंब्रज) यांच्याशीही संबंधित कंपनीच्या अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून संपर्क साधून पैशाची गुंतवणूक करण्यास सांगितले.

त्यावरून सचिन जगदाळे यांनी ७ लाख २४ हजार, आनंदा जगदाळे यांनी सहा लाख ७१ हजार ५००, दिग्विजय मराठे यांनी दोन लाख, मोहन जगदाळे यांनी चार लाख ५० हजार रुपये पाठवले. संबंधितांना सर्व व्यवहार अॅपच्या माध्यमातून फोनवर दिसत होते. मात्र, अचानक जुलै २०२१ महिन्यांमध्ये अॅप अचानक बंद झाले. त्यावर मी व मित्रांनी संबंधित फोन नंबरवर वारंवार संपर्क साधला; परंतु त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधिताविरोधात फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT