man 
सातारा

नागपूजेतून दिला कोरोनापासून स्वसंरक्षणाचा दिला अनोखा संदेश

फिराेज तांबाेळी

गोंदवले (जि. सातारा) : सामाजिक बांधिलकी जोपासत नागपंचमीदिवशी नागोबाच्या प्रतीकात्मक मूर्तीला मास्क बांधून नरवणे (ता. माण) येथील काशीद कुटुंबीयांनी कोरोनापासून स्वसंरक्षणाचा संदेश दिला. तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

नागपंचमीदिवशी नाभिक समाजाकडून प्रतीकात्मक नागमूर्ती बनविण्याची परंपरा आहे. साधारणतः दोन ते अडीच फूट उंचीची फणा काढून उभा असलेल्या नागाची मातीची मूर्ती बनवली जाते. त्यावर हरभरा डाळ, करडई, गुंज, तसेच गव्हाची खपलीचा वापर करून सजावट केली जाते. नरवणे (ता. माण) येथील हणमंत काशीद यांनी देखील गेली 46 वर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे. यंदा मात्र या सणावर देखील कोरोनाचे सावट पडल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून माण तालुक्‍यात कोरोनाबधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागमूर्तीच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न श्री. काशीद यांनी केला आहे. 

दर वर्षीप्रमाणे यंदाही नागमूर्ती बनवली असली, तरी त्यामध्ये मूर्तीच्या तोंडावर मास्क बांधण्यात आला आहे. येथील श्री सर्वेश्वर मंदिरात ही मूर्ती शनिवारी (ता. 25) सकाळी स्थानापन्न करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी मास्कचा वापर करून कोरोनापासून स्वसंरक्षण करावे, हाच संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मूर्तीची रविवारी (ता. 26) ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येईल. 


कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, यासाठी नागोबा मूर्तीच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून देशहिताला हातभार लागल्याचे समाधान मिळत आहे. 

- हणमंत काशीद, नाग मूर्तिकार, नरवणे 
 


(संपादन ः संजय साळुंखे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

Mumbai Crime: पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद पेटला, कोयता उपसला अन्...; सीएसएमटीबाहेर थरारक घटना

Bride Theft Case : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू भावोजीसोबत फरार, पोलीस तपासात खळबळजनक सत्य उघड; पतीसह कुटुंबाला मोठा धक्का !

Latest Marathi News Update : पंढरपुरात पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Samruddhi Road Accident : चिमुरडीचं हसू कायमचं हरपलं! समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत, थरकाप उडवणारा अपघात

SCROLL FOR NEXT