Satara 
सातारा

गोंदवल्यात वैभव गणेश मंडळाचा वृक्षारोपणाचा पायंडा, अन्नदानाची परंपरा यंदा खंडित

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्नदानाची परंपरा यंदा खंडित झाली असली तरी येथील वैभव गणेश मंडळाने मोठ्या जोमाने वृक्षारोपण करून त्यांच्या संवर्धनाचा नवा पायंडा पाडला आहे. गावालगतच्या गायरानात वृक्षराजी वाढवून निसर्गाला साथ देण्याच्या या निर्धाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा अन्नदानाचा वारसा गोंदवले बुद्रुकमध्ये जोपासला जातो. येथील गणेश मंडळांकडून ही परंपरा अखंडित राखली जाते. संपूर्ण गावलाच आमंत्रित केले जात असल्यामुळे उत्सव काळात मोठ्या उत्साहात जेवणावळी होत. शिवाय गावाचे गावपण व एकोपा टिकविण्यासाठीही मोठी मदत होते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी होऊ नये व संसर्ग वाढू नये, याबाबत काळजी घेतल्याने या परंपरेत खंड पडला आहे.

येथील वैभव गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदा वृक्षारोपण करून यंदाचा गणेशोत्सव हरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ वृक्षारोपण न करता या रोपांचे संगोपन करण्याचा निर्धारच करण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने ही रोपे दत्तक घेतली आहेत. फळझाडांबरोबरच रानटी रोपांची लागवड येथे करण्यात आली आहे. वृक्षारोपणासाठी निवडलेले हे क्षेत्र गोंदवले-शेवरी रस्त्यालगत असल्याने भविष्यात हा परिसर निसर्गरम्य होण्यास मदत होणार आहे. शिवाय गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान, गावालगतच्या माळरानावर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरवात केली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष ऋतुराज कट्टे, उपाध्यक्ष प्रथमेश नवले, श्रीकृष्ण कट्टे, अंगराज कट्टे, प्रवीण भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

""कोरोनामुळे यंदा अन्नदान करता येत नसले तरी गरजूंना धान्य वाटप करणार आहोत. शिवाय वृक्षसंवर्धन करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.'' 
-ऋतुराज कट्टे, अध्यक्ष, वैभव गणेश मंडळ, गोंदवले 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT