koregaon 
सातारा

वायरमनचा मृत्यू; तिघांवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

वाठार स्टेशन (जि. सातारा) : महावितरणच्या वाठार स्टेशन शाखेतील देऊर विभागात कार्यरत असणाऱ्या साहिल विजय खरात (वय 21) या प्रशिक्षित वायरमनचा विजेचा धक्का लागून पोलवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतरच नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

वाठार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल (मूळ रा. ल्हासुर्णे, ता. इंदापूर) हा महावितरण कंपनीच्या वाठार स्टेशन विभागातील देऊर शाखेत गेल्या सहा महिन्यांपासून प्रशिक्षित वायरमन म्हणून काम करीत होता. सध्या तो सातारारोड येथील त्याचे मामा गणेश माने यांच्याकडे राहात होता. काल (ता. 8) दुपारी पाच वाजता देऊर परिसरातील वीज गेल्याने वायरमन रमेश हुसेन भडकवाड, साहिल खरात व संदेश पवार हे तिघे दुरुस्तीच्या ठिकाणी गेले. संदेश हा वीजपुरवठा बंद करण्यासाठी गेला, तर साहिल हा दुरुस्तीसाठी खांबावर चढला. मात्र, विजेचा धक्का लागल्याने तो खांबावरून पडून गंभीररीत्या जखमी झाला. उपचारासाठी त्याला पिंपोडे बुद्रुकमधील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. 

या घटनेनंतर साहिलच्या नातेवाइकांनी घटनास्थळी व पोलिस ठाण्यात धाव घेतली. वायरमन गणेश भडकवाड हे असतानाही साहिलला विजेच्या खांबावर कसे चढू दिले, तसेच खांबावर विद्युत वाहक बंद करण्याचा परवाना न घेता व वीज बंद न करता प्रशिक्षित वायरमनला पोलवर चढवल्याने साहिलचा मृत्यू झाल्याची, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे साहिलचे चुलते भाऊसाहेब खरात यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश भडकवाड, वरिष्ठ अभियंता उत्तम जगन्नाथ मंचरे, शाखा अभियंता सागर प्रकाश पवार या तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज दुपारी बारा वाजता नातेवाईकांनी साहिलचा मृतदेह ताब्यात घेतला. वाठार स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे तपास करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

SCROLL FOR NEXT