khandala 
सातारा

व्वा! 98 वर्षांच्या आजोबांनी "त्याला' हरवलेच!

अश्‍पाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : शिरवळ येथील हाजी महेबुबशा बाबुमिया काझी (वय 98) या आजोबांनी कोरोनावर मात करून कोरोना योद्धा म्हणून लौकिक मिळवला. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. 

अनेक आजार असतानाही कोरोनाशी यशस्वी लढा दिल्याने कोरोनाला घाबारायचे नाही, असा आदर्श या आजोबांनी इतरांपुढे ठेवला आहे. शिरवळमध्ये लॉकडाउन असल्यामुळे शिरवळ न्यू कॉलनी येथील मेहबुशा काझी यांना अशक्तपणा आल्यामुळे 15 जुलै रोजी शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथम त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये श्री. काझी पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आरोग्य विभागाने 17 जुलै रोजी त्यांना उपचारासाठी सातारा येथे दाखल केले. त्या वेळी त्यांचे नातू इम्रान काझी यांनी डॉक्‍टरांना विनंती करून आजोबांची या वयात देखभाल कशी होणार? म्हणून आजोबांसोबत येण्याचा आग्रह धरला. सातारा येथे उपचार सुरू असताना मधुमेहाचा त्रास असतानाही सात दिवस इम्रान यांनी आजोबांची सुश्रषासह सर्व सेवा केली. त्यानंतर शिरवळ येथील विलगीकरण कक्षात चार दिवस ठेऊन या आजोबा व नातवाला घरी सोडण्यात आले. त्यावेळी शिरवळमध्ये स्थानिकांनी फुलांचा वर्षाव करत या आजोबांचे कौतुक केले. डॉक्‍टरांनी योग्य उपचार केल्याने आजोबा काझी कोरोनातून बरे झाले. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Shirur News : थंडावा शोधताना काळाचा घाला; कवठे येथे मुलांसोबत पोहायला गेलेल्या वडिलांचा बुडून मृत्यू

Waste Management Project : कचरा प्रकल्पातून आर्थिक नुकसान टाळा; विरोधीपक्ष नेत्यंची आयुक्तांकडे मागणी

Bridge Collapse : आमणोली येथील प्रवासी पूल कोसळला; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, दोषींवर कारवाईची मागणी

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

SCROLL FOR NEXT