सातारा

महसूल विभाग सतर्क; ठेकेदारास ठोठावला 75 लाखांचा दंड

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) ः कोयना विभागातील नेचलजवळ बंधारा बांधण्याच्या चाललेल्या कामात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन होत आहे. हजारो ब्रास दगड, माती उत्खनन दररोज या ठिकाणी होत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये या क्षेत्राचा समावेश होत आहे. उत्खननासाठी जिलेटिनद्वारे ब्लास्टिंग झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. विशेष म्हणजे उत्खनन करण्यास कोणतीही परवानगी घेतली नसून, बेकायदेशीरपणे हा प्रकार सुरू असल्याची माहिती उजेडात आली असून, पाटण तालुक्‍यातील हारगुडेवाडीनंतर महसूल विभागाने नेचल येथे कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. 

नेचल येथे लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात येत आहे. बंधाऱ्याच्या कामाचे ठेकेदार असणाऱ्या गजानन प्राईम कंपनीने काम करताना सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू केले आहे. बंधाऱ्याच्या पलीकडे दक्षिण बाजूला मोठ्या प्रमाणात डबराचे उत्खनन केले आहे. उत्खनन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन क्षेत्रात जिलेटिनचा वापर करून ब्लास्टिंगचा वापर केला गेला आहे. उत्खनन व त्यासाठी जिलेटिनचा वापर करून ब्लास्टिंग करण्यासाठी कसलीही परवानगी घेतली नसल्याने हेळवाकचे मंडलाधिकारी प्रकाश ब्रह्मे यांनी संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. हारुगडेवाडी येथील कारवाईनंतर शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदा उत्खनन करून शासनाचा कर बुडविणाऱ्यावर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारलेला आहे. नेचल येथे बेकायदेशीर उत्खनन करून पाच हजार ब्रास डबर, हजार ब्रास माती उत्खनन विनापरवाना केल्याप्रकरणी 75 लाख रुपयांचा दंड महसूल विभागाने संबंधित ठेकेदारास भरण्याचे आदेश दिले आहेत. 

वन्यजीव विभाग जागा होणार का? 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये जिलेटिन स्फोटकांचा वापर करून ब्लास्टिंग करायला परवानगी नाही. असे असले तरी या ठिकाणी कोणतीच परवानगी न घेता ब्लास्टिंग झाले आहे. महसूल विभागाने कारवाई केल्यानंतर वन्यजीव विभाग जागा होणार का? 

कऱ्हाडात वानराच्या हल्ल्यात मंगळवार पेठेतील दीड वर्षाची चिमुकली जखमी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cab Rules: कॅब ॲग्रीगेटर धोरणात मोठा बदल! कॅब राईड रद्द करणे चालकांना महागात पडणार; सरकार आता 'इतका' दंड वसूल करणार

CJP Jantar Mantar: 'सीजेपी'शी चर्चा करण्यासाठी मंत्री 'जंतरमंतर'वर जाणार?, अट मान्य करत मोदी सरकारची चर्चेची तयारी

Latest Marathi Update : तवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

दिल्लीतील CJP व विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज-उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा

Chilgoza Halwa Recipe: १ किलो हलव्यासाठी ६,००० रुपये! लखनौचा चिलगोजा का आहे इतका महाग?

SCROLL FOR NEXT