सातारा

काळा कडा ठरला असता कर्दनकाळ; ५०० फूट दरीत सावंतवाडीची बस काेसळली

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : केळघर घाटातील काळा कडा येथे बुधवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. देवरुख आगाराचे चालक मयूर पावनिकर (वय ४०), रामकिशन केंडे (वय ४२)  असे जखमींची नावे आहेत. घटनास्थळी मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, महाबळेश्वरचे आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे , स्थानक प्रमुख किरण धुमाळ, कार्यशाळा कर्मचारी महाबळेश्वर आगार, मेढा आगार व्यवस्थापक सुजित घोरपडे यांनी तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. 

हा अपघात झाल्यानंतर मुकवली माची येथील प्रकाश खुटेकर, विठ्ठल खुटेकर, सर्जेराव खुटेकर, बाळू खुटेकर, सुनील खुटेकर, रेंगडी येथील भरत कासुर्डे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दरीतून वर काढले. केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोचल्याने जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथे खासगी रुग्णालयात वेळेत नेता आले. 

स्वीडनच्या स्कॅनियाने बस करारासाठी भारतीय अधिका-यांना दिली ‘लाच’; वाहनाच्या कागदपत्रांत केला फेरफार

मेढा पोलिस ठाण्यातून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी आगाराची मालवाहतूक बस क्रमांक (एम. एच. २० बी. एल ०४२९) माणगावहुन कलिंगडे भरून सांगलीकडे चालली होती. केळघर घाटात ही बस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रेंगडी गावच्या हद्दीत काळा कडा येथे एका अवघड वळणावर आली असता चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने व बसवरील नियंत्रण सुटल्याने बस अंदाजे ५०० फूट खोल दरीत कोसळली. 

या अपघातात मालट्रकवर काम करणाऱ्या चालकांपैकी एका चालकाने दरीतून वर येऊन मार्गावरील इतर वाहने थांबून अपघाताची कल्पना दिली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत केल्याने या चालकांचे प्राण वाचले. यामुळे या चालकांना वेळेत उपचार मिळाले. आज (गुरुवार) घटनास्थळी विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभाग यंत्र अभियंता श्री. मोहिते यांनी भेट देऊन अपघाताची सविस्तर माहिती घेतली. या अपघाताची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने करत आहेत.

सातारा : एसटी महामंडळाची मुंबई-पुणेकरांसाठी खुशखबर

 बांधकाम विभागाने लक्ष द्यावे

बुधवारी रात्री चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला आहे.काळा कडा येथे असणाऱ्या या वळणाचा अंदाज नव्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना येत नाही .त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. या परिसरात यापूर्वी ही मोठे अपघात झाले असून या अवघड वळणावर अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक कठडे उभारले नाहीत. या ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्याची आवश्यकता आहे.अजून किती अपघात झाल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येईल असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT