Satara News sakal
सातारा

Satara News : पेरणीसाठी मिळवा अनुदानावर बियाणे ;अल्पभूधारकांना मिळणार निम्म्या किमतीत

शेतकऱ्यांना खरीप हंगामात चांगले व प्रमाणिक बियाणे मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचा व राज्य शासनाचा कृषी विभागाने या वर्षीही अनुदानावर बियाणे उपलब्ध केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शेतकऱ्यांना खरीप हंगामात चांगले व प्रमाणिक बियाणे मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचा व राज्य शासनाचा कृषी विभागाने या वर्षीही अनुदानावर बियाणे उपलब्ध केले आहे. त्यासाठी अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी, मागासवर्गीय शेतकरी यांना लाभ घेता येणार आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, भात, सोयाबीन, वाटाणा, घेवडा, मका, मूग आदी बियाणांसाठी अनुदान देण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीत अर्ज करावा लागणार आहे, तसेच कृषी विभागाकडून परमीट घेऊन स्वत:ही आवश्यक असलेले बियाणे शेतकरी खरेदी करू शकणार आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळवताना धडपड करावी लागते. कधी कधी चांगले म्हणून आणलेले बियाणे उगवत नाही. त्यामुळे दुबारी पेरणी करावी लागते. त्यातून आर्थिक नुकसानीही संभवते. यातून मार्ग काढून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कृषी विभागाकडून बियाणे उपलब्ध केले जात आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि राज्य सरकारचा कृषी विभाग या दोन्ही विभागांकडून ५० टक्के अनुदानावर बियाणे मिळू शकते.

जिल्हा परिषदेची योजना...जिल्हा परिषदेकडून बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पंचायत

समितीत जाऊन अर्ज भरावा लागेल. ही प्रक्रिया ऑफलाइन असल्याने शेतकऱ्यांना पंचायत समितीत जाऊन अर्ज भरावा लागेल. हा अर्ज निःशुल्क असून, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी, मागासवर्गीय शेतकऱ्यांनाच हा अर्ज भरता येणार आहे.

परमीट कसे मिळवाल...

हे परमीट घेऊन जाऊन शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून त्यांना आवश्यक असलेले बियाणे खरेदी करावे. त्यासाठी ५० टक्के अनुदान असेल. कृषी सेवा केंद्रात हे बियाणे परमीटवर निम्म्या किमतीत दिले जाते. त्या वेळी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रात परमीटसह आवश्यक कागदपत्रेही द्यावी लागणार आहेत. यामध्ये सातबारा, खाते उतारा, रेशनकार्डची झेरॉक्स आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT