सातारा

महाबळेश्‍वरात व्यापाऱ्यांचा विरोध; कडक लॉकडाउन फेरविचाराची मागणी

कडक लॉकडाउनचा फेरविचार करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर : जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे महाबळेश्वरच्या (mahabaleshwar lockdown) बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झाले आहेत. या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. विविध सोहळ्‍यांत गर्दी झाली तर कोरोना पसरत नाही. परंतु दुकानात पर्यटक (tourist) आले की कोरोनाचा फैलाव (corona) होतो, असे जिल्हाधिकाऱ्यांना सिध्द करायचे आहे का? असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे.

अनेक दिवसांच्या लॉकडाउननंतर महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी (collecotr) घेतला. या निर्णयानंतर पर्यटक शहरात येऊ लागले. यामुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळू लागला. जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर हा सात ते नऊ टक्क्यांच्या दरम्यान स्थिरावला. अनेक प्रयत्न करूनही तो खाली येत नसल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेतला. शनिवार-रविवार वीकेंडनंतर सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे व्यापारी व इतर व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर खाली येत नव्हता. तर मग अनलॉक जाहीर करण्याची घाई जिल्हाधिकाऱ्यांनी का केली? अधिकाऱ्यांत सावळागोंधळ सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी व नागरिकांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे.

यावेळी डॉ. साबने रोडवरील व्यापारी ॲड. संजय जंगम व अतुल सलागरे यांनी व्यापारी बांधवांची बाजू मांडली. ते म्हणाले ‘‘जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेत व्यापाऱ्यांना वेठीस धरले आहे. जिल्ह्या‍त सर्वत्र चोरून व्यवसाय केला जात आहे. परंतु शासनाचे कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे कोटेकोरपणे पालन करणारे महाबळेश्वरातील व्यापारी मात्र गुन्हेगार ठरत आहेत. शासनाने सांगितल्याप्रमाणे आम्ही कोरोना तपासण्या केल्या. कोरोना लशीचे दोन डोस घेतले. मास्कचा वापर करून आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहे. तरीही प्रशासन आम्हाला वेठीस धरत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT