Pethshivapur strictly closed sakal
सातारा

Patan Crime News : मुलीवर अत्याचारप्रकरणी पाटणमधील एका गावात बंद

पाटण तालुक्यातील एका गावातील युवकाने अल्पवयीन मुलीला वेळोवेळी दमदाटी, शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.

अरुण गुरव

पाटण तालुक्यातील एका गावातील युवकाने अल्पवयीन मुलीला वेळोवेळी दमदाटी, शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.

मोरगिरी - पाटण तालुक्यातील एका गावातील युवकाने अल्पवयीन मुलीला वेळोवेळी दमदाटी, शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा निषेध करीत एका गावात आज आठवडा बाजारासह दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवला. या बंदला नागरिकांनी उत्‍स्फूर्त प्रतिसाद दिला असून बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पाटण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यासंदर्भात संशयित युवक हा अल्पवयीन मुलीला दमदाटी, मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

त्यानंतर संशयित युवकावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित संशयितास कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तालुक्यातील एका गावात बंद ठेवण्यात आला. खासगी वाहतूकही बंद ठेवली होती. ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध नोंदवला. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पाटण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित संशयिताचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, अशी मागणी स्थानिकांच्या माध्यमातून वकील संघटनेकडे निवेदनाद्वारे केली आहे. अल्पवयीन मुलीशी अश्लील व निंदनीय कृत्य करणाऱ्या युवकावर कठोर शासन होण्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक व पाटण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT