सातारा

आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणार; शरद पवारांनी 'मराठा क्रांती'स साता-यात दिला विश्‍वास

सिद्धार्थ लाटकर

सातारा : मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी येथे आज (गुरुवार) मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना सांगितले. श्री. पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीस आज साता-यात आले होते. या बैठकीनंतर पवार यांनी काही संघटना, संस्था प्रतिनिधींची भेट घेतली. 

उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. ते उठविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा जिल्हा समन्वयकांनी श्री. पवार यांच्याकडे केली. त्यावेळी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. परंतु वारंवार अडचणी येत आहेत असे श्री. पवार यांनी समन्वयकांशी चर्चा करताना सांगितले. दरम्यान उच्च न्यायालयातील आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचेही पवार यांनी नमूद केले.

मराठा आरक्षणाबाबत अभ्यासाचा प्रश्न येतोच कुठे; उदयनराजेंचा भुजबळांवर जोरदार पलटवार

श्री. पवार यांच्या बरोबर मराठा आरक्षणाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांनी स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्‍वास आम्हांला दिल्याचे समन्वयकांनी ई-सकाळशी बोलताना सांगितले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा राजेंद्र क्षीरसागर, बंडूअण्णा कदम, ऍड. उमेश शिर्के, संदीप पोळ आदी उपस्थित होते.

शूरवीरांच्या मातीतील असल्याचा सार्थ अभिमान : खासदार पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT