सातारा

साता-याच्या जिल्हाधिका-यांनी डायलिसिसच्या रुग्णांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी संग्रहालयात सुरू केलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये पहिल्याच दिवशी कोरोनाचे 14 ऑक्‍सिजनवरील, तर चार व्हेंटिलेटरवरील रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना डायलिसिसची सुविधाही येथे उपलब्ध करण्यात आली असून, सुरवातीला दोन बेड उपलब्ध केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
 
छत्रपती शिवाजी संग्रहालयात जिल्हा कोविड हॉस्पिटल साेमवार (ता. 12) पासून सुरू झाले. याबाबत जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ""जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये आजपासून रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी ऑक्‍सिजनवरील 14 व व्हेंटिलेटरवरील चार रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. आता ज्या कोरोनाबाधित रुग्णांना डायलिसिसची आवश्‍यकता आहे, अशा रुग्णांसाठी येथे सुरवातीला डायलिसिसचे दोन बेड उपलब्ध केले आहेत. आगामी काही दिवसांत येथे चार बेड वाढविले जातील. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या बाधित रुग्णांनी दाखल होताना एचआरसीटी करूनच या रुग्णालयात यावे. जेणेकरून रुग्णाची संसर्गाची नेमकी परिस्थिती लक्षात येऊन तातडीने त्या पध्दतीचे उपचार करता येतील.''

जिल्हाधिकारी शेखर सिंहंच्या प्रयत्नांना ठाकरे सरकारचे पाठबळ
 
कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसमवेत केवळ एका नातेवाईकाला परवानगी असेल. पण, मुख्य इमारतीत रुग्णाशिवाय इतर कोणालाही प्रवेश नसेल. नातेवाईकांना घरी जाण्याची सूचना आम्ही करणार आहे. रुग्णालयाच्या विरुध्द बाजूस असलेल्या व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेत नातेवाईकांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे. येथे थांबण्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागणार असून, चहा, नाष्ट्याची सोय बचत गटांकडून केली जाणार आहे. येथे नातेवाईकांसाठी हेल्पडेस्कची सुविधा करणार असून, यामध्ये नातेवाईकांच्या विविध शंकांचे निरसन केले जाईल. आगामी काळात कोविड रुग्णांची संख्या वाढल्यास आयटीआयमध्ये सोय केली जाणार आहे.

रेमडिसिव्हर इंजेक्‍शन मोफत हवयं! शासकीय रुग्णालयांत या

ज्यांना खरोखरच हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचाराची गरज आहे, अशांनाच येथे दाखल करून घेतले जाणार आहे. उर्वरित रुग्णांना घरीच उपचार केले जाणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

नातेवाईकांना माहिती देणार 

कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उपचाराची माहिती नातेवाईकांना मिळण्यासाठी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेत एक कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात वैद्यकीय अधिकारी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत नातेवाईकांशी चर्चा करून रुग्णांची उपचाराची माहिती देणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT