सातारा

ग्रामस्थच पुन्हा ठरविणार शिरवळचा सरपंच; उद्या ग्रामसभा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : शिरवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यावर केलेल्या अविश्‍वास प्रस्तावावरील विशेष ग्रामसभेचे आयोजन उद्या (शुक्रवार, ता. 18) सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे. ही सभा तहसिलदार दशरथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानसंवर्धिनी प्रशाला येथे होणार आहे. या सभेच्या पार्श्‍वभुमीवर राजकीय उलथापालथीस वेग आला आहे. दरम्यान पानसरे यांनी निवडून आणण्यात महत्वाची भुमिका बजाविणा-यांनी त्यांची साथ सोडल्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटात कमालीची अस्वस्था निर्माण झालेली आहे.

शिरवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्या कारभाराच्या विरोधात शिवसेनेच्या सहा तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नऊ अशा 15 सदस्यांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. गेल्या वर्षीच हा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु सरपंच पानसरे यांनी त्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात दाद मागितली होती. त्यावेळी जिल्हाधिका-यांनी पानसरेंची मागमी फेटाळून लावली होती. आता उद्या (शुक्रवार) पानसरेंवरील अविश्‍वास ठरावाबाबत ग्रामसभा होणार आहे.

कोयनेत साकारणार पोलिस प्रशिक्षण उपकेंद्र; गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंची संकल्पना

सातारा जिल्ह्यातील शिरवळ ग्रामपंयातीच्या सरपंच यांच्या विरोधातील अविश्‍वास ठरावासाठी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभा होणार आहे. थेट सरपंच निवडून आलेल्या लक्ष्मी पानसरे यांचे राजकीय भवितव्य उद्या (शुक्रवार) शिरवळकरांवरच अवलंबून राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT