सातारा

अभिमानास्पद! शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. केशव राजपुरे जागतिक संशोधकांच्या यादीत

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) ः अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने अलीकडेच विविध विषयांत संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांची जागतिक यादी जाहीर केली. त्यात शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विषयाचे प्रा. डॉ. केशव राजपुरे यांचे नाव पदार्थ संशोधन (मटेरियल्स) या विषयाच्या यादीत समाविष्ट झाले आहे. या यादीत त्यांचे नाव जागतिक क्रमवारीत 1410 वे, तर भारतीय क्रमवारीत 37 वे आहे.
 
प्रत्येक संशोधकाचे कार्य, प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखांची संख्या, त्यांना मिळालेले सायटेशन्स, एच-इंडेक्‍स, संशोधनाची उपयोजकता यांसारख्या विविध निकषांवर संशोधक निर्देशांक तपासून स्टॅनफोर्ड विद्यापीठाने यादीतील क्रमवारी ठरवली आहे. प्रा. राजपुरे यांचे संशोधन क्षेत्र मटेरियल्स म्हणजे पदार्थ विज्ञान. हे सर्वसामान्यांच्या ओळखीचे जरी नसले तरी सर्वात जवळचे आहे. कारण सभोवताली जे काही दिसते, आपण ज्याला स्पर्श करू शकतो त्या सर्व गोष्टी "पदार्थ' या एकाच छत्राखाली येतात. दिसणाऱ्या पदार्थांचे न दिसणारे गुणधर्म शोधून त्याला सर्व प्राणिमात्रांच्या सुखसोयीसाठी वापरात आणण्याचे कार्य पदार्थ संशोधक करत असतात.

तुमच्या व्यवसाय वाढीसाठी सकाळचा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म

शिवाजी विद्यापीठाला उच्च संशोधन मान्यता मिळवून देणारे प्रमुख संशोधन क्षेत्र म्हणजे मटेरियल सायन्स आणि याच क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या दोन टक्के शास्त्रज्ञांच्या राजपुरे यांचा समावेश झाला आहे.

डॉ. राजपुरे यांचा जन्म अनपटवाडी (ता. वाई) या छोट्या वाडीत झाला. 1995 पासून सुरू केलेला हा संशोधन प्रवास 25 वर्षांनंतरही जगातील नामवंत शास्त्रज्ञांच्या पंगतीत बसून अविरत सुरू आहे. यातच त्यांच्या कौशल्यपूर्ण, गुणवत्ताधारी आणि अभिनव शास्त्रज्ञाची ओळख करून होते.

Diwali Festival 2020 कष्टाला तोड नाही! मतिमंदांच्या कलाकौशल्याने सातारकर भारावले

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT