Walse to Kagal Highway esakal
सातारा

वळसे ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम 'या' महिन्यापर्यंत होणार पूर्ण; सध्या कासवगतीने सुरू आहे काम

Walse to Kagal Highway : महामार्गाच्या कामामुळे सातारा ते कोल्हापूर (Satara to Kolhapur) हे अंतर कापण्यासाठी सध्या दीड तास जादा लागत आहे.

उमेश बांबरे

वळसे (सातारा) ते कागल या १२५ किलोमीटर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. एकूण २००८ कोटी रुपयांचे हे काम असून, आतापर्यंत १५९५ कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे.

सातारा : वळसे ते कागल या महामार्गाच्या (Walse To Kagal Highway) सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू असून, सध्या कासवगतीने काम सुरू आहे. आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामुळे सेवा रस्ते, मोठे पूल, बायपास तसेच महामार्गाच्या सुशोभीकरणाची कामे अपूर्ण असून, त्यासाठी पुढील वर्षी २०२५ मध्ये चार महिन्यांची मुदतवाढही मिळाली आहे. आतापर्यंत झालेल्या कामांवर तब्बल १५९५ कोटी रुपये खर्च झाल्याचे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी असून, सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकडेही एनएचआयने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.

महामार्गाच्या कामामुळे सातारा ते कोल्हापूर (Satara to Kolhapur) हे अंतर कापण्यासाठी सध्या दीड तास जादा लागत आहे. तरीही बहुतांशी ठिकाणी सहापदरीकरणाचे सिमेंटचे रस्ते पूर्ण झालेले आहेत, तसेच सेवा रस्त्यांचीही कामे झाली असून, काही गावांच्या ठिकाणी उड्डाणपूल, अंडरपास तसेच छोटे पूल ही कामे अपूर्ण आहेत. सध्या कामाचा वेग मंदावला असून, येत्या दोन महिन्यांत पुन्हा गतीने काम सुरू होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

वळसे (सातारा) ते कागल या १२५ किलोमीटर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. एकूण २००८ कोटी रुपयांचे हे काम असून, आतापर्यंत १५९५ कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जात नाही. वेळेवर निधी मिळत आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत टेंडरमध्ये आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने दहा पदरीकरणाच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे पावसाळ्यातील दोन-तीन महिने कामे बंद राहिली होती. त्यामुळे डिसेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने चार महिन्यांची मुदतवाढ घेतली. त्यामुळे एप्रिल २०२५ पर्यंत या रस्त्याचे लोकार्पण केले जाणार आहे.

झाडांअभावी महामार्ग भकास

महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर सेवा रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती; पण सहापदरीकरणाच्या कामावेळी ही सर्व झाडे तोडण्यात आली. त्यामुळे आता महामार्ग तरी प्रशस्त झाला आहे. तसेच दोन्ही बाजूने दुपदरी सेवा रस्ता झाला आहे. तरीही झाडे लावण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. महामार्गाच्या मधोमध जागा आहे, त्यावर शोभेची झाडे साउंड व लाइट बॅरिअर म्हणून लावली आहे; पण सेवा रस्त्याच्या कडेने कुठेही झाडे राहिलेली नाहीत. तब्बल पाच हजारांवर झाडे तोडली गेली. त्या जागी नवीन झाडे लावली जाणार का? असा प्रश्न आता वाहनचालक व पर्यावरणवाद्यांना पडला आहे. महामार्ग भकास दिसू लागला आहे.

सुरक्षेकडे दुर्लक्ष...

महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून गावांना प्रवेश दिलेला आहे; पण अशा ठिकाणी कोणतेही सूचना फलक नसल्याने वाहनचालकांना सेवा रस्त्यावर जाण्यासाठी जोड रस्त्याचा शोध घ्यावा लागत आहे, तसेच या ठिकाणी सिमेंटचे रस्त्याचे काम अर्धेच सोडले आहे. पुढे अरुंद महामार्ग असल्याने वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने कुठेही घुसून अपघात होत आहे. त्यासाठी सूचना फलक व रात्रीच्यावेळी दिसणारे ब्लिंकर लॅम्प लावावेत, अशी मागणीही वाहनधारकांतून होत आहे.

महामार्गाच्या कामातील त्रुटी दूर व्हाव्यात...

वळसे ते कागल या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी हॉटेल व धाबे असून, त्यांच्याजवळून सेवा रस्ता जात आहे. तरीही त्यांना थेट महामार्गावरून जोड रस्ता दिला गेला आहे. मुळात कायदेशीरदृष्ट्या असा जोड रस्ता देता येत नाही. तसे फलकही महामार्ग प्राधिकरणाने लावलेले आहेत; पण नियम धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी जोड रस्ता दिल्याने वाहने अचानक थेट महामार्गावर येत असल्याने अपघात होण्याचा धोका आहे. यासंदर्भात महामार्ग प्राधिकरणाने नियमावर बोट ठेवणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT