Satara
Satara 
सातारा

मुलासह वडूथच्या छायाताईंनी चाखली बारावीच्या यशाची चव

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : प्रत्येक जण आयुष्यभर विद्यार्थी असतो. शिकण्याला ना वयाचे बंधन असते, ना वेळेकाळेचे. त्याचीच प्रचिती देताना एरवी शेतात राबणाऱ्या एका मातेने आपल्या मुलासह बारावीची परीक्षा दिली. इतकेच काय तब्बल 23 वर्षांनी यशाची चव चाखताना प्रथम क्रमांक पटकाविण्याची किमयाही साधली. 
ही कथा छाया सुनील साबळे यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची. तितकीची ती जिद्दीची अन्‌ चिकाटीची. सातारा तालुक्‍यातील वडूथ हे त्यांचे गाव. पती सुनील अन्‌ त्या, दोघेही शेती करतात. सासपडे (ता. सातारा) हे छायाताईंचे माहेर. 1995 मध्ये त्या गावातील शिवछत्रपती विद्यालयातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. उल्लेखनीय म्हणजे त्या काळी त्यांना 75 टक्के गुण मिळाले. इंग्रजीवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे नागठाण्यातील श्रीरामकृष्ण विद्यालयातून त्यांनी अकरावीचे शिक्षणही पूर्ण केले. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना पुढे शिकता आले नाही. त्याच दरम्यान त्यांचा विवाह झाला.

नंतरच्या काळात संसारचक्र, मुले, त्यांचे संगोपन, घरची शेती यातून त्यांचे शिक्षण बाजूलाच पडत राहिले. शिकण्याची इच्छाही अपूर्ण राहिली. मधल्या काळात त्यांची मुलगी सायली ही कॉम्प्युटर इंजिनियर शिक्षण घेऊ लागली. मुलगा कुणाल बारावीत गेला. अशातच छायाताईंच्या शिक्षणाचा विषय पुढे आला. त्यांचे पती सुनील यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यातून त्यांनी साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले नाईट ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दिवसभर घरकाम, शेतीकाम अन्‌ मग त्यातून मिळालेल्या वेळेत अभ्यास असा त्यांचा दिनक्रम. त्यांची ही आगळी साधना अखेर फळाला आली. त्यातून छायाताईंनी 67 टक्के गुण मिळवत कला शाखेत प्रथम क्रमांक पटकाविला. कुणालनेही यशवंतराव चव्हाण सायन्स इन्स्टिट्यूटमधून यश संपादन केले. आपल्या या यशात पतीसह सासू लक्ष्मी, सासरे सुदाम, बंधू सुधीर जाधव, उमेश साबळे, शिक्षक श्री. पाटील यांचा वाटा महत्त्वपूर्ण असल्याचे त्या सांगतात. 


शिक्षणाला प्राधान्य हवेच! 

ग्रामीण भागात आजही मुलींच्या शिक्षणाकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही. काहींना परिस्थितीमुळे शिकणे कठीण ठरते. काहींना विवाहानंतर शिकण्याची संधी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर पालकांनी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यायला हवे, असे मत छायाताई यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT