सातारा

साताऱ्यात एस.टी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनासाठी 'आक्रोश'

प्रशांत घाडगे

सातारा : मागील तीन महिन्यांपासूनचे थकीत वेतन दिवाळीनिमित्त द्यावे यासह इतर मागण्यांसाठी सातारा एस.टी कर्मचाऱ्यांनी आज आक्रोश आंदोलन केले. या आंदोलनात एस.टी कर्मचारी कुटुंबासह सहभागी झाले होते. 

मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यात लॉकडाउनमुळे एसटीची बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. जवळपास चार महिने सेवा ठप्प असल्याने या काळात अनेकांना पूर्ण वेतनही मिळाले नाही. त्यानंतर कोरोनाच्या काळात एस.टी कर्मचारी जीव धोक्‍यात घालून राज्यभरात कर्तव्य बजावत होते. यामध्ये 70 हून अधिक कर्मचाऱ्यांना मृत्यू झाला. मात्र, आता दिवाळीच्या तोंडावर प्रशासनाकडून वेतनाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. परिणामी, एसटीचे तीन महिन्यांपासून वेतनच मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांपुढे रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सातारा आगारातील कर्मचारी व कुटुंबीयांनी तीन महिन्याचे थकीत वेतन मिळावे, महागाई भत्ता मिळावा, एस.टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आदी मागण्यांचे फलक हातात घेऊन घोषणा देत लवकरात-लवकर मागण्या मान्य करा, अशी मागणी केली. 

कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू 

मागील तीन महिन्यांचे थकीत वेतन अद्यापही मिळाले नाही. पगारच मिळाली नाही तर, कुटुंबाचा उदनिर्वाह चालणार कसा....असा प्रश्‍न आंदोलनाच्या ठिकाणी एका एस.टी कर्मचाऱ्यांच्या मुलीने उपस्थित करत पैशाअभावी मी शिक्षणापासून वंचित राहिली असल्याचे सांगत तिच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी उपस्थितही हेलावून गेले. तसेच आम्हाला हक्काचे पैसे द्या, अशीही मागणी या मुलीने केली.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT