सातारा

स्कूल बसचालकांचे कर माफ करा, अन्यथा आंदोलन : राज्य महासंघाचा इशारा

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : कोरोना कालावधीत स्कूल बस बंद राहतील, तोपर्यंत सर्व प्रकारच्या करांमध्ये शंभर टक्के माफी मिळावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन खंडाळा तहसीलदार यांना देण्यात आले. दरम्यान, या मागण्यांची दखल न घेतल्यास पाच ऑक्‍टोबरला तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूकदार महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. 

यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष रियाज शेख, आरिफ खान व इतर सदस्य उपस्थित होते. मार्च 2020 पासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतूकदारांची अवस्था बिकट असून अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

कोरोना कालावधीत स्कूल बस बंद राहतील, तोपर्यंत सर्व प्रकारच्या करांमध्ये 100 टक्के माफी द्यावी, शाळा सुरू झाल्यानंतर विनाअट, विनादंड वाहनांचे पासिंग करावे, स्कूल बसधारकांच्या वाहनांचे बॅंक कर्ज हप्त्यांना स्थगिती द्यावी, व्याज आणि दंड न आकारण्याबाबत बॅंकांना आदेश द्यावेत, यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

America-Israel: ट्रम्प-नेतान्याहूंमध्ये खडाजंगी? युद्धाच्या धोरणावरून मतभेद; अमेरिकेतील माध्यमांचे वृत्त

Bakrid Sacrifice Rule: गायीची कुर्बानी अनिवार्य नाही, बकरीदपूर्वी हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; धार्मिक परंपरेबाबत स्पष्ट भूमिका

ITI Admissions 2026: राज्यातील शासकीय-खासगी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; १,५७,६६४ जागांसाठी संधी

GT vs CSK Live: साई सुदर्शनचे शतक हुकले! शुभमन, बटलरनेही झोडले! चेन्नईसमोर मोठं लक्ष्य, संजू सॅमसन फलंदाजीला येणार का?

SCROLL FOR NEXT