सातारा

समाजहिताची कामे करीत गुण्यागोविंदाने नांदत आहे 30 जणांचे एकत्र कुटुंब!

मुकंद भट

ओगलेवाडी (जि. सातारा) ः येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक (कै.) विष्णू गणपती इंगळे यांचे तब्बल 30 जणांचे एकत्रित कुटुंब नव्या जमान्यातही ऐक्‍य व बंधुता जोपासते आहे. सामान्यांचे एकसंध मोठे कुटुंब गुण्यागोविंदाने व आनंदाने नांदते आहे. या कुटुंबातील लोकांचे चहा टपरी, शीतपेयांचा गाडा, इस्त्रीचा धंदा, पानपट्टी व स्कूल बसचालक आदी छोटे- मोठे उद्योग व्यवसाय आहेत. व्यवसायाबरोबर त्यांनी सामाजिक कार्यातून लोकांत राहून मिसळून यश साधून नाव कमवत आहेत.
 
स्वातंत्र्यसैनिक (कै.) विष्णू इंगळे यांच्या पत्नी भागीरथी इंगळे (वय 85) यांचे वार्धक्‍याने नुकतेच निधन झाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत महागाईत कष्ट व हिमतीने आपल्या कुटुंबाचा डोलारा जिद्द व चिकाटीने उभारला. त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या विचाराने पुढे वाटचाल करत आहे. त्यांच्या कुटुंबातील उद्धव इंगळे ऊर्फ तात्या (वय 73) हजारमाची ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. त्यांचे सामाजिक वेगळेपण आहे. ते परिसरात होणाऱ्या अंत्यसंस्कार विधीस, अपघात प्रसंगी, नैसर्गिक संकटात नेहमी आजही अग्रेसर असतात. 40 वर्षांच्या इस्त्री व्यवसायासह सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत असतात. त्यांच्या पत्नी रेखा या पतसंस्थेत उपाध्यक्ष होत्या. नंदा कुमार इंगळे यांनी ग्रामपंचायतीत सरपंच असताना अनेक विकासकामे व सुधारणा केल्या. त्यांचे पती कुमार इंगळेंनी स्कूल बस व्यवसायातून शाळेतील मुले व पालकांना मदत करून नाते जोडले.

डोंगरातून पायपीट करत अजून किती दिवस आम्ही शाळेत जायचे, कऱ्हाड आगाराच्या कारभारास विद्यार्थी वैतागले 

शारदा मधुकर इंगळे यांनी बझारमध्ये धान्य निवडण्याचे काम केले. विलास इंगळेंनी ओगले कॅंटीनमध्ये चहा बॉयचे काम केले. त्यांच्या पत्नी मंदा शीतपेयांचा गाडा चालवतात. कुटुंबातील जवळजवळ प्रत्येकाचा छोटे- मोठे व्यवसाय असून, स्वतःच्या पायावर उभे राहून एकत्रित कुटुंबास मदत करतात. कुमार इंगळे व उद्धव इंगळे म्हणाले, ""आम्हा सर्वांच्यात एकमेकांत आदर, ऐक्‍य व सहकार्याची बंधुताची भावना आहे. त्यावर आमचे घर चालते. त्यामुळे घरास घरपण मिळाले आहे.''

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chamoli Tunnel Collapse: अचानक स्फोटाचा आवाज, काही क्षणांत टनल बनली ‘मृत्यूचा सापळा’; 7 जणांचा मृत्यू, वाचलेल्यांनी सांगितला थरार

MD Smuggling: एमडी तस्करीसाठी दुबईतून फंडिंग; जरीपटका येथील मुख्य आरोपीविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

Maharashtra River Linking: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प; याच वर्षी काम सुरू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून 5,737 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू

Kolhapur Baby Death : दूध पाजताना काळजी घ्या! अवघ्या 31 दिवसांच्या बाळाचा ठसका लागून दुर्दैवी अंत; कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT