सातारा

कऱ्हाड : शासकीय 'अभियांत्रिकी'च्या प्रगतीस 25 लाखांचे पॅकेज

सचिन शिंदे

कऱ्हाड : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील नामांकित कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्यूहमध्ये 185 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. त्यात सर्वोच्च 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज आयटीच्या प्रगती शर्मा विद्यार्थिनीने पटकावले आहे. कोरोना काळात नोकऱ्यांची स्थिती बिकट असतानाच येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय त्याला अपवाद आहे. महाविद्यालयात प्लेसमेंटच्या डिसेंबरअखेर 185 वर ऑफर्स पोचल्या आहेत. त्यात टीसीएस, कॅपजेमनी, कॉग्निझंट या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वोच्च 25 लाखांचे पॅकेजचा मान महाविद्यालयाच्या प्रगती शर्माने पटकावला आहे. अनेक विद्यार्थी चार ते साडेसात लाखांच्या वेतनावर निवडले आहेत. त्याव्यतरिक्त अन्य विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जात आहेत. 

या निवडीबद्दल प्राचार्य संस्था डॉ. ए. टी. पिसे म्हणाले, ""महाविद्यालयाने 60 वर्षांत पदवीसाठी 300 इनटेक कपॅसिटीच्या महाविद्यालयाचा आकडा वाढतो आहे. नवीन शिक्षण तंत्रज्ञान संख्यासह गुणात्मक वाढीमुळे ते शक्‍य झाले आहे. महाविद्यालय देश पातळीवरील टेक्वीप कार्यक्रमांतर्गत निवडले आहे. संस्थेत दर वर्षी नामांकित कंपन्या येतात. त्यात जास्तीत जास्त विद्यार्थी निवडले जातात. त्यासाठी सर्व जण प्रयत्न करतात. इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्‍शन विभागातर्फे अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण दिले. कोरोनाच्या काळात माजी विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन प्रशिक्षण दिले. इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्‍शन विभागातर्फे विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली. मकट एजन्सीने त्यासाठी संवाद साधला. करिअर, प्लॅनिंग, त्यांचे निरीक्षणानुसार प्रशिक्षण व नोकारीची तयारी करून घेतली. आयटी इंडस्ट्रीची वाढती गरज लक्षात घेऊन संगणक प्रोग्रमिंग भाषा शिकवण्याचे विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण दिले. संस्थेत 150 संगणकाचे सेंटर आहेत. कंपन्यांच्या ऑनलाइन चाचणीची सोय संस्थेत केली होती.''

New Year 2021: न्यू इअर पार्टीचे प्लानिंग करताय, मग ही काळजी घ्या !

उदयनराजेंचा भाचा असल्याचे सांगून 'त्याने' केला काेल्हापूरात दूसरा विवाह; 29 लाखांना फसविले
 
महाविद्यालयाचे डीन डॉ. अनिल आचार्य म्हणाले, ""संस्थेच्या ऍकॅडमिक परीक्षा विभागाने काटेकोर गुणवत्तेचे काम केले आहे. सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांशी चांगले नाते ठेवले आहे. त्यामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे. टीम वर्कमुळे प्लेसमेंट सेल प्रगती करीत आहे. यापुढेही नॉलेज, स्कील आणि ऍटिट्युड यावर विशेष लक्ष देणार आहोत. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 2021 हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांची वेबसाइट केली आहे. माजी विद्यार्थी त्यावर नोंदणी करावी, त्यासाठी डॉ. लक्ष्मण कुमारवाड यांच्याशी संपर्क साधावा.''

पालकमंत्री, खासदारांच्या तालुक्यात वैद्यकीय अधिका-यांची गरज; दक्ष कऱ्हाडकर सरसावले

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT