सातारा

डोंगरातून पायपीट करत अजून किती दिवस आम्ही शाळेत जायचे, कऱ्हाड आगाराच्या कारभारास विद्यार्थी वैतागले

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : गावच्या मार्गावर धावणारी एकमेव एसटी बस बंद ठेवल्याने ढेबेवाडी खोऱ्यातील दुर्गम निवी, कसणीसह त्या परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांतील सुमारे ऐंशीहून अधिक विद्यार्थी शाळा सुरू होऊनही तीन आठवड्यांपासून घरातच बसून आहेत. या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने ऑनलाइन शिक्षणावर मर्यादा असतानाच सुरू असलेली ही गैरसोय प्रचंड शैक्षणिक नुकसानीला कारणीभूत ठरत आहे.
 
दुर्गम मत्रेवाडी, जाधववाडी, निवी, कसणी, निगडे, घोटील, म्हाइंगडेवाडीसह परिसरातील अनेक गावे व वाड्यावस्त्यांतील विद्यार्थ्यांना माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी मेंढ, ढेबेवाडी, तळमावले, कऱ्हाड येथे जावे लागते. दूरच्या अंतरामुळे एसटी प्रवासाचा सवलतीचा पास काढून विद्यार्थी ये- जा करतात. त्या मार्गावर ढेबेवाडी- निगडे ही कऱ्हाड आगाराची एकमेव बस धावते. सकाळपासून रात्रीपर्यंत बसच्या तीन फेऱ्या होतात. लॉकडाउनमध्ये बंद ठेवलेली बससेवा अलीकडे काही दिवस सुरू करून पुन्हा बंद केल्याने ऐंशीहून अधिक विद्यार्थी तीन आठवड्यांपासून अन्य गावातील शाळेत न जाता घरातच बसून आहेत.

कऱ्हाड : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येथे भरा अर्ज
 

मेंढ येथील श्री जोतिर्लिंग विद्यालयातीलच 52 विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. दुर्गम गावांमध्ये मोबाईलला नेटवर्क नसल्याने ऑनलाइन शिक्षणावर मर्यादा आहेत. शाळेकडून एसटी महामंडळाला या गैरसोयीची माहिती दिलेली असली, तरी कार्यवाही शून्यच आहे. थोडे फार विद्यार्थीच डोंगरातून पायपीट करून शाळेत येत आहेत. बहुतांश विद्यार्थी बंद एसटीमुळे घरीच आहेत. कऱ्हाड आगाराला या गैरसोयीची माहितीही आम्ही दिली आहे, अशी माहिती मेंढच्या श्री जोतिर्लिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजीराव शेडगे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT