Bhuinj Police esakal
सातारा

स्मशानभूमीत अघोरी पूजा; पुण्याच्या सहा जणांना भुईंज पोलिसांकडून अटक

विलास साळुंखे

स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीवर अंधश्रद्धेतून अघोरी पूजा करणाऱ्या सहा जणांना भुईंज पोलिसांनी अटक केलीय.

भुईंज (सातारा) : सुरूर (ता. वाई) येथील स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीवर अंधश्रद्धेतून अघोरी पूजा करणाऱ्या सहा जणांना भुईंज पोलिसांनी (Bhuinj Police) हडपसर (पुणे) (Hadapsar Pune) येथून अटक केलीय. राहुल राजेंद्र भोसले, नितीन लक्ष्मण चांदणे, विशाल बाबासाहेब चोळसे, सुमन बाळासाहेब चोळसे, सुशीला नितीन चोळसे, केसर लक्ष्मण चांदणे (सर्व रा. बाबासाहेब आंबेडकर कमानीसमोर रामटेकडी, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबतचा अधिक तपास भुईंज पोलीस करत आहेत.

याबाबत भुईंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी हडपसर (पुणे) येथून आलेल्या तीन महिला व तीन पुरुष दुपारी बारा ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान सुरूर येथील स्मशानभूमीत हळदी, कुंकूचे गोलाकार रिंग करून त्यावर अल्पवयीन मुलीच्या मांडीवर जिवंत कोंबडा ठेवून मृतदेह जाळण्याच्या ठिकाणी अग्नी पेटवून अघोरी विद्येचा प्रयोग करीत होते. ती सर्व परिस्थिती पाहता हा नरबळीचा प्रकार आहे की काय, अशी शंका तेथील जागरूक नागरिक व युवकांना आल्याने त्यांनी त्यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पलायन केले होते. या प्रकाराबद्दल भुईंज पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. तद्नंतर आज पोलिसांनी त्यांना अटक केली असून कारवाईचे काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT