Satara Sugarcane Rate Agitation esakal
सातारा

Raju Shetti : ऊसदर आंदोलनाची साताऱ्यात ठिणगी; आक्रमक आंदोलकांनी ट्रॅक्टर दिला पेटवून

माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज आणि उद्या ऊसतोड बंद आंदोलन पुकारलं आहे.

हेमंत पवार

माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज आणि उद्या ऊसतोड बंद आंदोलन पुकारलं आहे.

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर (Satara Sugarcane Rate Agitation) करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज गुरुवारी आणि उद्या शुक्रवारी ऊसतोड बंद आंदोलन पुकारलं होतं. तरीही ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मध्यरात्रीच्या सुमारास आग लावली. त्यामुळं आता सातारा जिल्ह्यात (Satara District) ऊसदर आंदोलनाची ठिणगी पडलीय.

याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी (Umbraj Police) तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु केलीय. कोल्हापूर (Kolhapur), सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसदर कमी देत आहेत. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेवून १७ आणि १८ नोव्हेंबरला ऊसतोड आणि ऊस वाहतूक बंदचे आंदोलन पुकारले होते.

मात्र, तरीही इंदोली गावाजवळ उसानं भरलेल्या ट्रॅक्टर कारखान्याला ऊस वाहतूक करत असल्यानं अज्ञात आंदोलकांनी मध्यरात्री ट्रॅक्टरच पेटवला आहे. त्याची माहिती समजताच ऊंब्रज पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळं सातारा जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाची ठिणगी पडली असून आता हे आंदोलन वाढणार की काय अशी स्थिती निर्माण झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT