रस्‍ता रोखून धरत शेतकऱ्यांनी राज्‍य सरकारचा निषेध केला sakal
सातारा

साताऱ्यात ‘स्‍वाभिमानी’चा ‘रास्‍ता रोको’

वीज वसुलीच्‍या नावाखाली शेतकऱ्यांवर सुरू असणारी कारवाई थांबवावी

गिरीश चव्हाण

सातारा: राज्‍यातील शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा करण्‍यात यावा, या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्‍या आंदोलनास पाठिंबा देण्‍यासाठी आज येथे स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍या वतीने रास्ता रोको करण्‍यात आला. आंदोलनावेळी बाँबे रेस्‍टॉरंट परिसरातील रस्‍ता रोखत शेतकऱ्यांनी सरकारच्‍या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज पुरवावी तसेच वीज वसुलीच्‍या नावाखाली शेतकऱ्यांवर सुरू असणारी कारवाई थांबवावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी सरकारकडे केली होती. मागणी करूनही त्‍याबाबतची कार्यवाही होत नसल्‍याने कोल्‍हापूर येथे श्री. शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले असून, त्‍याला आज सातारा येथे पाठिंबा देण्‍यासाठी आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, मनोहर येवले, हेमंत खरात व शेतकरी सहभागी झाले होते.

आंदोलनावेळी कोरेगावकडे जाणारा रस्‍ता रोखून धरत शेतकऱ्यांनी राज्‍य सरकारचा निषेध केला. साताऱ्याबरोबरच उंब्रज येथे देवानंद पाटील, दादासाहेब यादव व शेतकऱ्यांनी तसेच फलटण येथील जिंतीरोड परिसरात धंनजय महामुलकर, नितीन यादव व शेतकऱ्यांनी, दहिवडी येथे अनिल पवार, तानाजी देशमुख, दत्ताभाऊ घार्गे व शेतकऱ्यांनी आंदोलन करत शासनाचा निषेध केला. स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्‍या मागण्‍यांविषयी लवकर कार्यवाही न झाल्‍यास आगामी काळात गनिमी काव्‍याने आंदोलन करण्‍याचा इशाराही आंदोलकांनी या वेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

SCROLL FOR NEXT