भिलार (सातारा) : कोरोना संसर्ग (Coronavirus) कमी झाल्याने शासनाने काही निर्बंध (corona lockdown) घालून पर्यटन स्थळावरील हॉटेलला परवानगी दिली आहे. त्याचपद्धतीने घोडे व्यावसायिकांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी पाचगणी येथील टेबललॅंड व्यापारी असोसिएशनच्या (Tableland Traders Association) वतीने आज मुख्याधिकारी गिरीश दापकेकर (Chief Officer Girish Dapkekar) यांना निवेदनाद्वारे केली आहे. सर्व घोडे व्यावसायिक (Horses Traders) व टेबललॅंड व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. (Tableland Traders Association Demand To Permission For Horse Traders At Panchgani Satara Marathi News)
कोविडमुळे गेली दोन वर्ष सर्व व्यवसायाबरोबरच घोडे व्यवसायही बंद असल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, की कोविड-१९ या विषाणूमुळे गेली दोन वर्ष सर्व व्यवसायाबरोबरच घोडे व्यवसायही बंद असल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संपूर्ण दोन वर्षांच्या काळामध्ये पर्यटन हंगामामध्ये सर्व व्यवसाय बंद करण्यात आले होते. त्यामुळे आमचे कुटुंब, तसेच घोड्यांची उपासमार झालेली आहे. त्यामुळे शासनाने हॉटेलवरील बंदी पाचगणी, महाबळेश्वर येथे उठवली आहे.
तशाच पद्धतीने आम्हीही पालिकेने आखून दिलेले ट्रॅकमधूनच व कोरोना नियमांचे पालन करून आमचे घोडे चालवू. आमच्या निवेदनाचा सहानुभूतिपूर्वक विचार व्हावा. व्यावसायिकांच्या भावनांचा उद्रेक झाला तर त्यास शासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला आहे. निवेदनावर टेबललॅंड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, नामदेव चोपडे, दिलीप कांबळे, अनिल वन्ने यांच्या सह्या आहेत.
Tableland Traders Association Demand To Permission For Horse Traders At Panchgani Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.