सातारा

गुजरातला चोरुन नेत असलेली वाळू महाराष्ट्रातील 'या' तहसीलदारांनी राेखली

सल्लाउदीन चाेपदार

म्हसवड (सातारा) : माण नदीच्या पात्रातील वाळूची चोरी करून चक्क गुजरातमध्ये विक्रीसाठी नेत असल्याचे समजताच तहसीलदार बी. बी. माने यांनी छापा टाकून मालवाहतुकीचा 22 चाकी ट्रेलर येथे पकडला. दरम्यान, या कारवाईत संबंधित ट्रेलर चालकाने नाट्यमयरीत्या धूम ठोकून पलायन केले.
हे मंत्री म्हणाले... पोलिसांचे मनोधैर्य खचू देणार नाही 
 
राज्यात व परराज्यातही गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे धैमान सुरू झाल्यामुळे ठिकठिकाणच्या वाळू उपसा केल्या जाणाऱ्या नदीची पात्रे दुथडी भरून वाहत आहेत. माण तालुक्‍यात पावसाने हजेरी लावली असली, तरी माण नदीच्या पात्रात ठिकठिकाणी सिमेंट बंधाऱ्यामुळे नदीच्या उगमापासून असलेले बंधारे टप्प्याटप्प्याने भरू लागल्यामुळे म्हसवड भागातील नदीचे पात्रात अजूनही पुरेसे पाणी वाहत नाही. पात्र ठिकठिकाणी कोरडे राहिल्याने चोरून वाळूचा उपसा करून तो जिल्ह्यात परजिह्यात व गुजरात राज्यात विक्रीस नेऊन कमाईची स्पर्धाच सुरू आहे. या व्यवसायात राजकीय, कार्यकर्ते यांचाही सहभाग दिसून येत आहे. सांगली ते गुजरात राज्यात नियमित वाळूची वाहतूक करणारा 22 चाकी 40 टन वजनभार वाहतूक क्षमतेचा ट्रेलर येथील वाळू तस्कराच्या मदतीने गुरुवारी (ता.23) माण नदीच्या पात्रातील वाळू भरण्यासाठी दाखल झाला.

काॅंग्रेस नेत्याचे ठाकरेंना पत्र ; फडणवीसांच्या काळात 'या' कंपन्या महाराष्ट्रात आल्याच नाही, निदान आता तरी... 

नदी पात्रातून वाळूचा उपसा करून नदी पात्रालगत साठा करून ठेवलेली वाळू त्या ट्रेलरमध्ये भरली जात असल्याची माहिती तहसीलदार बाई माने यांना मिळाली. त्यांनी म्हसवडचे तलाठी ए. यु. अखडमल, म्हसवड व राणंदचे कोतवाल राजू पाचोळे, ए. डी. गुजर आदी कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी छापा टाकून ट्रेलर ताब्यात घेतला. ट्रेलरच्या चालकाने पलायन केले. त्यानंतर ट्रेलर म्हसवड पोलिस ठाण्यात आणण्यासाठी येथील तलाठी अखडमल यांना मेहनत घ्यावी लागली. चौकशीनंतर हा ट्रेलर येथील वाळू भरून गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

माण नदीतील वाळू चोरीला आळा घालण्यासाठी कर्मचारी व मी स्वतः प्रयत्नशील आहे. नदी पात्रालगतच्या शेतकऱ्यांनाही वाळू तस्करांकडून दमबाजीचे प्रकार घडतात. जिवावर उदार होऊन आम्ही कर्मचारी समवेत वाळू चोरट्यांवर कारवाई करीत आहे.

- बाई माने, तहसीलदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT