Tadwale
Tadwale esakal
सातारा

'कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा'

आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने (Government) घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे व गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन तहसीलदार किरण जमदाडे (Tehsildar Kiran Jamdade) यांनी केले. (Tehsildar Kiran Jamdade At Tadwale Gave Instructions To The Citizens Regarding Coronavirus)

गावात कोरोना बाधित रुग्ण हे गृह विलगीकरणात असल्याने शासनाने ठरवून दिलेले नियम पाळत नसल्याने रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.

तडवळे (ता. खटाव ) येथे तहसीलदार श्री. जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी भेट दिली. त्यावेळी श्री. जमदाडे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोईनवाड, सरपंच गणपतराव खाडे आदी उपस्थित होते. तहसीलदार जमदाडे म्हणाले, गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण हे गृह विलगीकरणात असल्याने शासनाने ठरवून दिलेले नियम पाळत नसल्याने रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये गृह विलगीकरण बंद करून जिल्हा परिषद शाळेत (School) संस्थात्मक विलगीकरण सुरू करण्यात आले आहे.

गटविकास अधिकारी काळे म्हणाले, आगामी काळात गाव कोरोनामुक्तीसाठी कोरोना दक्षता कमिटी व ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत. गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी बसणे, सामाजिक अंतर न पाळणे अशा नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या (Police) वतीने कारवाई केली जात असल्याचे पोलिस उपनिरीक्षक पालेकर यांनी सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी गावातील गृह विलगीकरणातील रूग्णांच्या भेटी घेऊन त्यांना सूचना केल्या. यावेळी कोरोना कमिटीचे सदस्य शरद पाटील, डॉ. प्रकाश पाटोळे, बाळासोा पवार ,अमोल साबळे, गाव कामगार तलाठी श्रद्धा निकम, पोलिस पाटील संदीप खाडे, आरोग्य सेवक श्रीकांत माळवे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी जे. के. काळे, दादा शिंदे, सचिन पवार,आशा स्वयंसेविका यास्मिन शेख, योगिता काळे आदी उपस्थित होते.

Tehsildar Kiran Jamdade At Tadwale Gave Instructions To The Citizens Regarding Coronavirus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT