Tejaswini Chorge  esakal
सातारा

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी क्लासेसची गरज नाही : तेजस्विनी चोरगे

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शहर गाठण्याची आणि क्लासेस (Classes) लावून तयारी करण्याची गरज नाही. कष्टाची तयारी, अभ्यासातील सातत्य आणि अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागण्याची जिद्दच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवेल, असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (Maharashtra Public Service Commission Examination) यश मिळवून नुकतीच सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या तेजस्विनी भरत चोरगे (Tejaswini Chorge) यांनी दिला. (Tejaswini Chorge Has Said That Classes Are Not Necessary For Success In Competitive Examination)

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शहर गाठण्याची आणि क्लासेस लावून तयारी करण्याची गरज नसल्याचे मत तेजस्विनी चोरगे यांनी व्यक्त केले.

गलमेवाडी (ता. पाटण) येथील तेजस्विनी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, कोणत्याही क्लासेसचा आधार न घेता एमपीएससीत उज्ज्वल यश संपादन केले. नुकतीच त्यांची पिंपरी-चिंचवडच्या सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी (Assistant Motor Vehicle Inspector) नियुक्ती झाली. त्यांचे वडील भरत चोरगे यांचा तळमावलेत टेलरिंगचा व्यवसाय असून हे कुटुंब अनेक वर्षांपासून तळमावल्यात वास्तव्यास आहे. तेजस्विनी म्हणाल्या, ‘‘स्पर्धा परीक्षेत उतरून तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे ना, मग मोठा खर्च, शहरातील क्लासेस, किचकट अभ्यास हा सगळा बागुलबुवा तुमच्या डोक्यातून प्रथम काढून टाका.

तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्या क्षेत्राविषयीची समग्र माहिती तुमच्याकडे असायलाच हवी. हे झटपट मिळणारे यश नाही. त्यासाठी दररोज पुरेसा वेळ देवून आणि कष्ट घेऊन नियमित अभ्यास करायला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला चांगला मार्गदर्शक मिळणेही खूप महत्त्‍वाचे असते. मी चार वर्षे तयारी केली. इतरही अनेक परीक्षा दिल्या. क्लास न लावता स्वतः आवश्यक माहिती संकलित केली. लायब्ररीचा पुरेपूर वापर केला. यु ट्यूब तसेच नेटवरून माहिती मिळविली. आई सुनीता, वडील भरत चोरगे, आजोबा केशव माटेकर यांच्यासह सर्व कुटुंबीय, नातेवाईक पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने प्रोत्साहन मिळत गेले. अजून कष्ट घेऊन श्रेणी एकचे पद गाठायचे माझे स्वप्न आहे.’’

ध्येय गाठताना लगेच यश मिळेलच असेही नाही. त्यासाठी पुन्हा-पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्याकडे असायलाच हवी. अपयशाने खचलात तर संपलात, न डगमगता नव्या उत्साहाने पुढे चालत राहा.

-तेजस्विनी चोरगे, सहायक मोटार वाहन निरीक्षक

Tejaswini Chorge Has Said That Classes Are Not Necessary For Success In Competitive Examination

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT