Yashwantrao Chavan Samadhi
Yashwantrao Chavan Samadhi  sakal
सातारा

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी संरक्षक भिंतीसाठी टेंडर : सहकारमंत्री पाटील

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधी परिसरातील संरक्षक भिंतींचे 15 कोटींचे टेंडर प्रसिध्द झाले आहे. गॅबीयन पध्दतीने त्याचे काम होणार आहे. राज्याकडून त्यासाठी निधी उपलब्ध होणार असल्याने ते काम लवकरच सुरु होईल, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.

विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवले होते. आमदार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते काम झाले असते. मात्र त्यानंतर निधीअभावी ते काम रखडले. मध्यंतरी टेंडर निघाले मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. सध्या 15 कोटी 86 लाखांचे टेंडर सध्या प्रसिध्द झाले आहे. त्या कामाला लवकरच सुरुवात होईल. ते गॅबीयन पध्दतीने काम होणार आहे.

ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शासकीय वन्यजीव उपचार केंद्र वराडे येथे मंजुर झाले आहे. त्यामुळे जखमी वन्य प्राण्यांवर तातडीने उपचार मिळतील. मुख्यमंत्र्यांकडे संबंधित खाते आल्यावर त्याचा चांगला पाठपुरावा झाला. त्यासाठी मुख्य वन्यजीव संरक्षक सुनिल लिमये यांनी त्यासाठी सहकार्य केले. त्यासाठी रोहन भाटे, नाना खामकर यांनीही प्रयत्न केले. पहिल्या टप्यात पावणेदोन कोटी रुपये मंजुर झाले आहेत. त्यानंतर टप्याटप्याने सात कोटींचा निधी मिळणार आहे. त्यातुन कोल्हापुर, सांगली, रत्नागिरी येथील वन्यप्राण्यांवर उपचार करण्यात येतील. आहे ते जंगल वाचवले पाहिजे. त्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. अभिनेते देवराई प्रकल्पाव्दारे चांगले काम करत आहेत. वन विभागही त्यासाठी प्रयत्न करत आहे. वन्य प्राण्यांसाठी त्यांच्या अधिवासाच्या परिसरात पाण्याची सोय करण्याच्या सुचना वन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चार ते नऊ एप्रिल दरम्यान साताऱ्यात होत आहे. त्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. पाच एप्रिलला सायंकाळी त्याचे उदघाटन होईल. त्यानंतर नऊ एप्रिलला मुख्य लढत होणार आहे. अल्पसंख्यांक परिसरात मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्याला पाच कोटींचा निधी मंजुर झाला आहे. त्यामध्ये फलटण, सातारा, कऱ्हाड, पाटण, खटाव, माण, जावळी, कोरेगाव सह अन्य तालुक्यातील कामांचा समावेश आहे. जलजीवन मिशन अंतर्गत मसुर, उंब्रज, पाल, गोवारे येथील कामांना मंजुरी मिळाली आहे. ती कामे लवकरच सुरु होतील.

ढेबेवाडीतील वनविभागाचे कार्यालय हलवु नये

ढेबेवाडीतील वन विभागाचे कार्यालय अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरु आहेत, अशी माहिती मला एकाने दिली. त्यामुळे मी मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांच्याशी संपर्क साधुन त्यांना ते कार्यालय हलवु नये असे सुचीत केले असल्याचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगीतले. त्यामुळे ते कार्यालय तेथुन हलेल असे वाटत नाही. वनसंपदा, वन्यप्राणी वाचण्यासाठी ते कार्यालय ढेबेवाडीत असणे आवश्यक असल्याचे मंत्री पाटील यानी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

SCROLL FOR NEXT