सातारा

कातरखटावला चोरट्यांचा धुमाकूळ; पाच कुलूपबंद घरे फोडली

धनंजय चिंचकर

कातरखटाव (जि. सातारा) : कातरखटाव (ता. खटाव) येथे शनिवारी मध्यरात्री गावच्या मध्यभागी असणाऱ्या पाच कुलूपबंद घरांत चोरी झाली, तरीही चोरट्यांनी दीड हजारांची रोकड लंपास केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री शिवाजी चौकातील लक्ष्मण शिंदे, जानाई चौकातील विक्रम सुतार यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. 

हाती काहीच न लागल्याने त्यांनी भास्कर बागल व रत्नाकर बोडके यांच्या घराकडे मोर्चा वळवत त्यांच्या घरातील झाडाझडती घेतली. तेथील सुटकेस व कपाटातील कपडे विस्कटून टाकली. त्यानंतर माजी सरपंच तानाजी बागल यांच्या शेजारील घरांना बाहेरून कड्या लावल्या व बागल यांच्या घरात प्रवेश करून पासबुकमध्ये ठेवलेले दीड हजार रुपये चोरून नेले. चोरट्यांनी जाताना घरातील सफरचंदावर डल्ला मारला. एकाच रात्री पाच कुलूपबंद घरे फोडून चोरी झाल्याने कातरखटाव व परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
 
गेली नऊ महिने कोरोनाशी लढा देत असलेली जनता कुठे तरी पूर्वपदावर येत असतानाच परिसरात चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले. या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त सुरू करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

सातारकरांनाे! लॉकडाउन टाळणे आपल्याच हाती; अशी घ्या काळजी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

Pune News : शेतकऱ्यांच्या १२ कोटींच्या मोबदल्यावरून महापालिकेची नामुष्की; आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई टळली

PMC News : पुणे महापालिका भाडेतत्त्वावर घेणार २५० घंटागाड्या; कचरा संकलन व्यवस्था होणार अधिक सक्षम

Flood News : कोरेगाव मुळ बंधाऱ्यावरून दुचाकीसह ज्येष्ठ वाहून; एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

Pune News : ‘आर्किटेक्ट’ पदवीचा बेकायदेशीर वापर महागात; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा कठोर इशारा

SCROLL FOR NEXT