मलकापूर (जि. सातारा) ः आगाशिवनगर येथील अभिनव कॉलनी व शिवपार्वती कॉलनीत चोरट्यांनी तीन बंद घरे फोडली. दोन घरांतील एक लाख 75 हजारांची रोकड व सहा तोळ्यांचे दागिने लंपास केले. दोन घरांतच सुमारे पावणेपाच लाखांचा चोरट्यांनी डल्ला मारला, तर एका घरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. ही चोरीची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. बंद घरे फोडण्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथील अभिनव कॉलनीत तुषार जाधव यांचे घर आहे. घरातील सर्व सदस्य सणबूरला कामानिमित्त गेले होते. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मेन दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्या कपाटातील एक लाख 75 हजार रोख रक्कम, एक तोळ्याच्या तीन साखळ्या, लहान दहा अंगठ्याही चोरट्यांनी लंपास केल्या. शेजारचे संतोष भोसले यांच्या घराचा दरवाजाच्या कडीकोयंडा चोरांनी तोडला. दरवाजाच्या आत आणखी एक दरवाजा होता म्हणून चोर आत जाऊ शकले नाहीत. संबंधित चोरट्यांनी टेहळणी करत शिवपार्वती कॉलनीत राहणारे हणमंत फुके यांच्या घराकडे मोर्चा वळवला. फुके हे पुण्याला गेले होते. चोरट्यांनी त्यांचे बंद घराचा कडीकोयंडा तोडून दोन तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. असा दोन घरांतील सुमारे सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व एक लाख 75 हजारांची रोख रक्कम असा सुमारे पावणेपाच लाखांचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला.
चोरट्याचा साता-यातील रिओने घेतला अचूक वेध
शनिवारी सकाळी तीन घरांत झालेला चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. आगाशिवनगरात बंद घरे फोडण्याचे सत्र सुरूच असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही चोरीची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अनिल शिरोळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ व श्वानपथकास पाचारण केले होते. श्वान पथकातील श्वानाने घरापासून डोंगराच्या दिशेने मार्ग काढत थोड्याच अंतरावर घुटमळले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.