सातारा

त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेल्यांसाठी रानभाज्या ठरताहेत पर्वणी

Balkrishna Madhale

सातारा : सध्या कोरोना महामारीचा काळ सुरू असला तरी, आपलं जगणं हे निसर्गचक्राशीच जोडलेलं आहे. त्यामुळे ऋतुमानानुसार आपला आहार, पेहराव बदलतो. चार महिन्यांच्या उन्हाळ्यानंतर पावसाळा आला की निसर्ग आपली सगळी धनदौलत उधळतो आणि रानभाज्यांची मेजवाणी बहाल करतो. फ्लॉवर, कोबी, गवार आणि बटाटा ह्या रोजच्या जेवणात असणा-या भाज्या आहेत. नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळलेल्यांसाठी रानभाज्या म्हणजे एक पर्वणीच असते.

साताऱ्यातील ग्रामीण भागात या रानभाज्या मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. या भागात शेंडवल, सप्रुबा, भारांगा, पिळंदी, मोरवेल, कुर्डू, आळंबी, भुईफोड, चिचुरट्या इत्यादी भाज्या रानभाज्या म्हणून ओळखल्या जातात. आपल्या रोजच्या आहारात असणाऱ्या भाज्या या शेती करून, लागवडीने, मळा करून लावलेल्या असतात. वांगी, भेंडी, गवार पालेभाज्या रोजच्या आहारात असतातच मात्र, ज्या भाज्यांची लागवड कोणीही केली नसून त्या आपोआप रानात उगवतात, अशा भाज्यांना रानभाज्या म्हणतात.

पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाज्यांची चव चाखलीत का?

पावसाळा सुरु झाला की दीड ते दोन महिन्यांसाठी रानभाज्या डोंगरकपारीत येत असतात. त्यामुळे या रानभाज्यांची शहरात मागणी मोठय़ा प्रमाणात असते. ग्रामीण लोक उपजिवीका भागवण्यासाठी याच रानभाज्यांचा आधार घेतात, गरज आहे ती फक्त शहरातील नागरिकांनी त्यांना सहकार्य करण्याची. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने नागरिकांची परवड होत आहे. 
ज्या ठिकाणी जंगलाचे अस्तित्व आहे. त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती व पावसामुळे विविध प्रकारच्या रानभाज्या आढळतात. ज्या ठिकाणी मानवाचा वावर कमी आहे. अशा सर्व ठिकाणी रानभाज्या मोठय़ा निर्माण होतात.

Video : काय सांगता...बायकोसाठी नवऱ्याने दिली बारावीची परीक्षा अन् दोघांना मिळाले सेम टू सेम मार्क

सह्याद्रीच्या कुुशीतील रानभाज्या ठरताहेत आजारांवर रामबाण उपाय!

सध्या कोरोना महामारीमुळे शेतकरी पुरता पिचला आहे. मात्र, या काळात ग्रामीण भागातील शेतकरी, तेथील नागरिक लॉकडाऊनच्या काळात या रानभाज्यावरती आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे या भाज्या बाजारातही उपलब्ध होत नसल्याने कडधान्यावरती अवलंबून राहावे लागत आहे.

संपादन - संजय शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो रिक्षासाठी LPGचा पुरवठा कमी

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

SCROLL FOR NEXT