Satara LCB esakal
सातारा

Shweta Shinde : अभिनेत्री श्वेता शिंदेंच्या घरी चोरी करणारा ताब्‍यात; चोरट्यांकडून 13 लाखांचे 18 तोळे दागिने हस्तगत

या पथकाने गुन्ह्यात राजूचा सहभाग असल्याचे उघडकीस आणले. चौकशीमध्ये त्याने एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली.

सकाळ डिजिटल टीम

या गुन्ह्यातील १८.३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या यशाबद्दल शेख यांनी एलसीबीच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

आरळे : अभिनेत्री श्वेता शिंदे (Actress Shweta Shinde) यांच्या घरात चोरी करणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) अटक केली आहे. त्यांच्यासह तीन गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे १३ लाख रुपयांचे १८ तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewellery) हस्तगत करण्यात आले आहेत.

राजकुमार ऊर्फ राजू ओंकारप्पा आपचे (रा. कोथळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे त्याचे नाव आहे. जून २०२४ मध्ये त्याने शिंदे यांच्या पिरवाडी येथील बंगल्यात चोरी केली होती. या गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी एलसीबीचे निरीक्षक अरुण देवकर यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व अमित पाटील यांचे पथक तपासासाठी तयार केले होते.

Satara LCB

या पथकाने गुन्ह्यात राजूचा सहभाग असल्याचे उघडकीस आणले. चौकशीमध्ये त्याने एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामध्ये सातारा शहर, भुईंज व लोणंद हद्दीतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. या गुन्ह्यातील १८.३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या यशाबद्दल शेख यांनी एलसीबीच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT