Covid 19  esakal
सातारा

काेविड बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी हाेईनाच

जिल्ह्यात एक हजार 543 रुग्ण आढळल्याने आतापर्यंत उच्चांकी बाधित रुग्णसंख्या आढळल्याने नागरिक धास्तावले आहेत.

प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एक हजार 1543 बाधित रुग्ण आढळले असून, 38 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने 480 नागरिकांना सोडण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत होता. ऑक्‍टोबरनंतर कोरोनाचे मृत्यू व बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, मागील महिनाभरापासून 700 च्या टप्प्यात बाधित रुग्णांची संख्या सापडत असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले, तसेच गेल्या दोन दिवसांपासून बाधितांचा टप्पा जिल्ह्यात हजारीच्या पुढे गेल्याने कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटत नसून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. गेल्या वर्षी 5 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वात जास्त एक हजार 117 रुग्ण जिल्ह्यात आढळले होते. आता जिल्ह्यात एक हजार 543 रुग्ण आढळल्याने आतापर्यंत उच्चांकी बाधित रुग्णसंख्या आढळल्याने नागरिक धास्तावले आहेत.

38 बाधितांचा मृत्यू

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे भुईंज ता. वाई येथील 80 वर्षीय महिला, चांदक ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष, भरतगाव ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, नागाचे कुमटे ता. खटाव येथील 42 वर्षीय पुरुष, खटाव ता.खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, सदरबाजार ता.सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, बापुदासनगर ता.फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, रनदुल्लानगर ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, काळचौंडी ता. माण येथील 60 वर्षीय महिला व जिल्हयातील विविध खाजगी कोविड हॉस्पिटल मध्ये चिखली ता. कराड येथील 53 वर्षीय महिला, मलकापुर ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, अभ्याचीवाडी ता. कराड येथील 46 वर्षीय पुरुष, घारेवाडी ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, शनिवार पेठ ता. कराड येथील 55 वर्षीय महिला.

धक्कादायक! 'कोरोना लस' घेतल्यानंतर रेठऱ्यात एकाचा मृत्यू; आरोग्य विभागाकडून 'खुलासा'

भोळी ता. खंडाळा येथील 64 वर्षीय पुरुष, तामीणी ता.पाटण येथील 48 वर्षीय पुरुष, गोळेश्वर ता. कराड येथील 32 वर्षीय पुरुष, रसाटी ता. पाटण येथील 72 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर ता. महाबळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुष, कोडवली ता. फलटण येथील 76 वर्षीय पुरुष, लिंगमळा ता. महाबळेश्वर येथील 70 वर्षीय पुरुष, कर्वेनगर ता. जि. पुणे येथील 61 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, खोजेवाडी ता. सातारा येथील 73 वर्षीय महिला, लिंब ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, लडेगाव ता. खटाव येथील 76 वर्षीय पुरुष, सैदापुर ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, भोसे ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, खटाव ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, पुसेसावळी ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, विरवडे ता. माण येथील 33 वर्षीय पुरुष, खावली ता. वाई येथील 60 वर्षीय पुरुष, बोरगाव ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, धर्मपुरी ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष, मलकापुर ता. कराड येथील 51 वर्षीय पुरुष, जावळी ता. जावळी येथील 51 वर्षीय पुरुष, ओंड ता. कराड येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 38 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

साता-यात औषध वगळता अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने 'लाॅक'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT