दागिने चोरीप्रकरणी तीन अट्टल चोरांना अटक; पोलिसांनी आवळल्या मुसक्या sakal
सातारा

दागिने चोरीप्रकरणी तीन अट्टल चोरांना अटक; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत या गुन्ह्याच्या तपासाविषयी माहिती दिली

विलास साळुंखे

भुईंज : वेळे (ता. वाई) येथे नातेवाईकांच्या बंद घरात भरदिवसा धाडसी चोरी करून दागिन्‍यांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या भुईंज पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला आहे. काही तासांतच ही चोरी उघडकीस आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत.

भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत या गुन्ह्याच्या तपासाविषयी माहिती दिली. वेळे येथे सात डिसेंबरला दुपारी एक ते तीनच्या दरम्यान अभिषेक पवार यांच्या बंद घराचे कुलूप-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील दोन लाख दोन हजार ८२६ रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. कपाटाचा पत्रा लागल्याने घटनास्थळी चोरट्याच्या रक्ताचे डाग पोलिसांना तपासाच्या दिशेने घेऊन गेले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सहकाऱ्यांनी तपासाच्या सूचना केल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने संशयितापर्यंत पोलिसांना पोचण्यात यश आले व चोरीच्या दागिन्यांसहित रोख रक्कम असा मुद्देमाल व चोरीस वापरलेली दुचाकीसह संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवत बोलते केले.

या चोरीसह पुणे जिल्ह्यात घरफोडी, जिवे मारण्याची धमकी अशा प्रकारचे वेगवेगळे ३४ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार आकाश हेमराज परदेशी (रा. येरवडा-पुणे) व त्याचे साथीदार मनोज एकनाथ मोरे (रा. भोलावडे, ता. भोर) व विवेक नामदेव कानडे (रा. वडगाव, ता. भोर) यांना ताब्यात घेऊन अटक केली, अशी माहिती श्री. कांबळे यांनी दिली.

या तपासात स्वतः आशिष कांबळे, निवास मोरे, सहायक फौजदार विकास गंगावणे, हवालदार शंकरराव घाडगे, आनंदराव भोसले, शिवाजी तोडरमल, दत्तात्रय धायगुडे, चंद्रकांत मुंगसे, अविनाश नेहरकर, सुशांत धुमाळ, धोंडिराम गायकवाड यांनी परिश्रम घेतले. केवळ काही तासांत हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल भुईंज पोलिसांचे जिल्हा पोलिसप्रमुख अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT