NCP esakal
सातारा

बँक निवडणुकीसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

गिरीश चव्हाण

बँकेची निवडणूक जाहीर झाल्‍यापासून जिल्‍ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सातारा : सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्‍या (Satara Bank Election) राजकीय घडामोडींना वेग आला असून, या निवडणुकीसाठी अर्ज भरण्‍याचा उद्या (सोमवार) शेवटचा दिवस आहे. या दिवशी कोण-कोण अर्ज दाखल करणार, याकडे जिल्‍हावासीयांचे लक्ष लागून राहिले असून, अर्ज भरण्‍यावरच पुढील राजकीय रणधुमाळीचे भवितव्‍य अवलंबून असणार आहे. दरम्यान, राष्‍ट्रवादीसह (NCP) इतर पक्षीय उमेदवार शक्‍तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल करणार आहेत.

जिल्‍हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्‍यापासून जिल्‍ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक बँकेच्‍या प्रथा आणि परंपरेनुसार पक्षविरहित करण्‍याच्‍या सूचना खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) आणि उपमुख्‍यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्‍या होत्‍या. यानुसार बँकेसाठी इच्‍छुक असणाऱ्यांची मोट बांधण्‍याचे काम विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी हाती घेतले होते. यासाठी त्‍यांनी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील यांच्‍यात संयुक्‍त बैठक घडवून आणली. या बैठकीत मतदार संख्‍येनुसार जागा वाटप व इतर बाबी जाणून घेत प्रत्‍येक मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, यावर चर्चा झाली.

मध्‍यंतरीच्‍या काळात मतदारसंघातील घुसखोरीवरून आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे यांच्‍यात वाद झाला होता. या वादाचे पडसाद जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीत उमटण्‍यास सुरुवात झाली होती. या वादावरही अजित पवार यांच्‍या उपस्‍थितीत चर्चा झाली. चर्चेअंती आमदार शिंदे यांच्‍याविरोधातील होणारी संभाव्‍य बंडखोरी मोडून काढण्‍यात आल्‍याची चर्चा सुरू आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्‍याचा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या राष्‍ट्रवादीसह इतर पक्षीय उमेदवार शक्‍तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरल्‍यानंतरच निवडणुकीच्‍या लढतीचे व इतर राजकीय चित्र स्‍पष्‍ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT