सातारा

वाहनाच्या धक्‍क्‍याने वाहतूक पोलिस ठार

शशिकांत सोनवलकर

दुधेबावी (जि. सातारा) : अपघातातील वाहनाचा जोरदार धक्का लागल्याने गस्त घालणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाचा मृत्यू झाला. सचिन सोनवलकर (वय 35, रा. दुधेबावी, ता. फलटण) असे मृताचे नाव असून महामार्गावर पनवेल हद्दीत मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला. 

मुंबई पोलिस दलात कार्यरत असणारे सचिन सोनवलकर हे मुंबई-पुणे महामार्गावर गस्त घालत होते. मंगळवारी मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पनवेल हद्दीत पुणे बाजूला जाणाऱ्या मालवाहू ट्रकला मागून आलेल्या ट्रेलरने धडक दिली. या ठिकाणी गस्त घालणारे सोनवलकर यांना अपघातातील वाहनाचा जोरदार धक्का लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ठाणे वाहतूक विभागाचे अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी घटनास्थळी भेट दिली. 

दुधेबावी येथे पोलिस दलातर्फे मानवंदना देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशाने मन हेलावून गेले. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले सचिन हे मुंबई पोलिस दलात भरती झाले होते. त्यांचे शालेय शिक्षण दुधेबावी येथे, तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण तिरकवाडीतील जयभवानी हायस्कूलमध्ये झाले. फलटणमधील मुधोजी हायस्कूल व मुधोजी महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : मध्यरात्री भरधाव ट्रकची कारला भीषण धडक; पुण्यात बाप-लेकीसह मेहुण्याचा जागीच अंत, 'ती' भेट ठरली अखेरची...

SBI Clerk Result 2026: SBI क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार; 'या' संकेतस्थळावर पाहा रिजल्ट

Supe Baramati History : बारामतीच्या इतिहासात नवी भर! सिद्धेश्वर मंदिराच्या बांधकामाचे 300 वर्षांपूर्वीचे शिलालेख उघड, मराठा काळातील संस्कृतीचे दर्शन

Maharashtra Revenue Department : महसूल विभागातील सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार

Live-in Partner vs Dowry Law: पत्नी नाही, तरी गुन्हा? लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा कायद्याचा हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल

SCROLL FOR NEXT