Khambatki Ghat Accident esakal
सातारा

Khambatki Ghat Accident : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात अपघात; मालट्रकने चार गाड्यांना उडविले

Khambatki Ghat Accident : या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अशपाक पटेल

हा ट्रक चौथ्या कारला अडकून राहिला. यामुळे सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला, तर कारमधील लोकांचे प्राण ही वाचले. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात (Khambatki Ghat Accident) रात्री एक वाजण्याच्या सुमारास तामिळनाडू वरून मुंबईकडे जाणाऱ्या मालट्रकचा ब्रेक फेल झाल्याने, ट्रकने लागोपाठ चार कार गाड्यांना उडविले. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

यात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती अशी, की रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर 'एस कॉर्नर'वर (S Corner Accident) मागून येणाऱ्या ट्रकचा (टीएन 46 एस 14 99) ब्रेक फेल झाला. येथे उतार असल्याने ट्रकचा वेग वाढला. त्यामुळे ट्रकाने पुढील चार गाड्यास जोराने ठोकरले. त्यानंतर या गाड्या रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्या.

दरम्यान, हा ट्रक चौथ्या कारला अडकून राहिला. यामुळे सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला, तर कारमधील लोकांचे प्राण ही वाचले. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना घडताच भुईंज महामार्ग पोलीस यांच्या नेतृत्वाखाली निंबाळकर, गायकवाड, खंडाळा पोलिस परांदे व इतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT