सातारा

कऱ्हाड, पाटण, माण तालुक्यात आढळले 22 कोरोनाबाधित; सातारा जिल्ह्यात 42 रुग्ण घरी परतले

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात आज (मंगळवार)  22 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 42 जणांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी नमूद केले.
सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूजसाठी क्लिक करीत रहा

कराड तालुक्यातील तळबीड येथील 44, 40, 5 आणि 25 वर्षीय पुरुष, 30, 27, 10 आणि 9 वर्षीय महिला. खोडशी येथील 60, 34 आणि 4 वर्षीय पुरुष, 52, 26 आणि 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला., पाटण तालुक्यातील कासणी येथील 38 आणि 35 वर्षीय पुरुष, 35, 27 आणि 26 वर्षीय महिला., माण तालुक्यातील बिदाल येथील 28 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दरम्यान जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 42 जणांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले  आहे. यामध्ये माण तालुक्यातील खडकी येथील 44 वर्षीय पुरुष, इंजाबव येथील 28 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष, मोगराळे येथील 34 वर्षीय पुरुष, धनवलेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, वावरहिरे येथील 35 वर्षीय पुरुष, कुळकजाई येथील 25 वर्षीय पुरुष. कराड तालुक्यातील तळबीड येथील 65 वर्षीय महिला, तारुख येथील 35, 70, 10, 14 वर्षीय महिला, 12 आणि 15 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 53 वर्षीय महिला, गोवारे येथील 39 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 24 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील काळकुटवाडी येथील 21 वर्षीय तरुण, सुर्यवंशीवाडी 28 वर्षीय पुरुष. जावळी तालुक्यातील सायगांव येथील 60 वर्षीय महिला.

अरेच्चा... पोलिस गाडीवर सायरनचा आवाज नव्हे...तर साने गुरुजींच्या कविता

सातारा तालुक्यातील संगमनगर 14 वर्षीय महिला, बाबेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, धावली येथील 17 वर्षीय पुरुष, फलटण रोड येथील 20 वर्षीय पुरुष, लिंब येथील 39 वर्षीय महिला, जिहे येथील 8 आणि 20 वर्षीय पुरुष, 3, 30, 57, 42 आणि 19 वर्षीय महिला. वाई तालुक्यातील उडतरे येथील 33 वर्षीय महिला, वाई येथील 53 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 30 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 38 आणि 52 वर्षीय महिला, 46 पुरुष, अभेपुरी येथील 1 पुरुष. कोरेगाव तालुक्यातील सासपडे येथील 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

577 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 32, कृष्णा हाॅस्पिटल कराड येथील 79, उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 41, फलटण येथील 44, कोरेगाव येथील 24, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 98, शिरवळ येथील 70, रायगाव येथील 60, पानमळेवाडी येथील 12, मायणी येथील 21, महाबळेश्वर येथील 18, पाटण येथील 33, खावली येथील 45 असे एकूण 577 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीकरीता एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

Coronavirus : विश्‍वासार्हतेमुळे वृत्तपत्रांनाच वाचकांची पसंती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT