two brother Parth and Shreyas made laboratory at home low-cost innovation Sakal
सातारा

Satara News : विद्यार्थ्यांनी साकारली घरातच प्रयोगशाळा,अल्प खर्चात नवनिर्मिती; शेळकेवाडीतील पार्थ अन् श्रेयसची किमया

पार्थ राजेंद्र शेळके अन् श्रेयश संजय शेळके ही या विद्यार्थ्यांची नावे. ते दोघे चुलतभाऊ आहेत. शेळकेवाडी येथील प्राथमिक शाळेत शिकतात.

सुनील शेडगे

नागठाणे : चिकित्सकपणा, जिज्ञासावृत्ती, नवनिर्मिती आदींची प्रचिती देताना दोन शाळकरी भावंडांनी आपल्या घरातच प्रयोगशाळा साकारली आहे. विशेष म्हणजे अत्यंत अल्प खर्चात, टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी ही किमया साधली आहे.

पार्थ राजेंद्र शेळके अन् श्रेयश संजय शेळके ही या विद्यार्थ्यांची नावे. ते दोघे चुलतभाऊ आहेत. शेळकेवाडी येथील प्राथमिक शाळेत शिकतात. त्यांनी आपल्या घरी प्रयोगशाळा तयार केली आहे. त्यांना शिकविणारे शिक्षक श्रीकृष्ण दळवी यांनी त्यांना सातत्याने प्रोत्साहित केले. मुख्याध्यापिका छाया जगताप, प्रतिभा ढाणे, सरिता कदम यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले.

सौरऊर्जेवर चालणारी वीज, पाण्याची बचत करणारे भांडे, कमी पाण्यात हात धुता येणारे नळ, हातपंपाचे वर्किंग मॉडेल आदी साधने या प्रयोगशाळेत आहेत. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तू या प्रयोगशाळेत पाहावयास मिळतात.

आंबा काढण्यासाठी झेलणी, झाडांना पाणी देण्यासाठी झारी, पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक, पावसासंदर्भात माहिती देणारे यंत्र, पाण्याची टाकी भरल्याची माहिती देणारे यंत्र आदी साहित्य त्यांनी तयार केलेले आहेत.

हवेच्या दाबावर कार्य करणारे विविध प्रयोगही पाहावयास मिळतात. गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, विस्तार अधिकारी जयश्री शिंगाडे, केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती

ही प्रयोगशाळा तयार करताना श्रीकृष्ण दळवी, वर्गमित्र सोहम शेळके यांची मदत लाभली. उल्लेखनीय म्हणजे प्रयोगशाळा अत्यंत अल्प खर्चात आकारास आली आहे. त्यातील बहुतेक वस्तू या टाकाऊ आहेत. मात्र, त्यांचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेसाठी घरातील एका कोपऱ्याचा वापर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे असलेल्या कल्पकतेला प्रोत्साहन दिल्यास उत्तम नवनिर्मिती होऊ शकते. पार्थ अन् श्रेयस यांनी हेच दाखवून दिले आहे.

- श्रीकृष्ण दळवी, मार्गदर्शक शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT