सातारा

नाशिकला निघालेल्या सांगलीच्या व्यापा-यांचा पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात; दोघे ठार

विलास साळूंखे

भुईंज (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर जोशी विहीर येथील उड्डाणपुलावर ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर चार जण जखमी झाले. या अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाने जोशी विहीर उड्डाणपुलावर समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये कारमधील सहा जणांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी साताऱ्याला घेऊन जाताना दोघांचा मृत्यू झाला.

सुभाष बाबूराव पाटील (वय 71, रा. बोरगाव, ता. तासगाव) व प्रवीण नामदेव टेगिमाळी (वय 18, रा. दत्त कॉलनी, जत, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. महेश महादेव नवाळे (वय 42), शुभांगी महेश नवाळे (वय 32), शबाना मोहम्मद पठाण (वय 38, सर्व रा. विटा), प्रणव दीपक लोंढे (वय 21, रा. वाळुंज, ता. खानापूर) अशी जखमींची नावे आहेत.

या सर्वांवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण व्यापारी असून ते मंगळवारी काविळ रोगावरील उपचारासाठी नाशिकला निघाले होते. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक शीतल जाणवे-खराडे, भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, हवालदार शिवाजी तोडरमल, राजकुमार खताळ आदींनी मदतकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT