IFS Nanasaheb Ladkat sakal
सातारा

सातारा : अडीचशे किलोमीटरचा सायकल

प्रवास करून स्वीकारला पदभार; आयएफएस नानासाहेब लडकत यांचा आदर्श

सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक म्हणुन वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांनी आज पदभार स्वीकारला. त्यासाठी त्यांनी अंबर दिव्याची गाडी, थाटमाट टाळुन पुणे ते कोल्हापुर तब्बल २५० किलोमीटरचा सायकल प्रवास करून पदभार स्वीकारला. त्यांचा हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण हे निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर सहाय्यक विभागीय आयुक्त दर्जाचे अधिकारी वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांनी आज सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक म्हणुन पदभार स्वीकारला. ते महाराष्ट्र वनसेवेत 1986-87 च्या बॅचमध्ये रुजू झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कामाची सुरवात केली. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथेही ते सहायक वनसंरक्षकपदी होते. भारतीय वन सेवेत 2006 साली पदोन्नती मिळाली आहे. लडकत यांनी यापूर्वी जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. कोल्हापूरला पदभार स्वीकारण्यापूर्वी ते पुणे वन कार्यालयात कार्यरत होते. त्यांचे येथे उपसंचालक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, बाळकृष्ण हसबनीस, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, क्रीएटीव्ह नेचर फ्रेंड्स चे नाना खामकर, हेमंत केंजळे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT