two pistols found for sale in Karhad seized one arrested satara crime news Sakal
सातारा

Satara Crime : कऱ्हाडला विक्रीसाठी आलेल्या दोन पिस्तूल जप्त, एकास अटक

गावठी पिस्तुल विक्रीकरता आलेल्या एकास शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. करवडी फाटा येथे कारवाई झाली

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

Satara News : गावठी पिस्तुल विक्रीकरता आलेल्या एकास शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. करवडी फाटा येथे कारवाई झाली. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या दोन गावठी बनावटीची पिस्तुल व एक दुचाकी असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दादा उर्फ युसुफ दिलावर पटेल (वय 45, रा. वाघेरी, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर व परिसरातील अवैध शस्त्रे शोधून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पाटणचे डीवायएसपी विवेक लावंड,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना सूचना दिल्या होत्या. यावर काम करत असतानाच करवडी फाटा येथे एकजण गावठी पिस्तुल बाळगून चोरटी विक्री करण्याच्या इराद्याने थांबला आहे अशी माहिती राजू डांगे यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली.

पोलीस उपनिरीक्षक डांगे यांनी पथक घेऊन करवडी फाटा येथे सापळा रचून छापा टाकला. यावेळी दादा पटेल हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला झडप घालून पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे वजा पिस्तुल व एक दुचाकी असा सुमारे दोन लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे करीत आहेत.

पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांचे मार्गर्दशनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू, स्वातंत्र्यदिन कार्यालयातच साजरा

Chakan Industrial Area Roads: वाहतूक कोंडीने उद्योगांची घुसमट; चाकण औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था

SCROLL FOR NEXT