Satara News esakal
सातारा

Satara News : कऱ्हाडनजीकच्या बाबरामाचीत दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी अंत

शेतातील फ्युज बाॅक्सचा शाॅक बसल्याने झाला मृत्यू

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : बाबरमाची - सदाशिवगड, (ता. कऱ्हाड) येथे शेतात विहिरीनजीकच्या फ्युज बॉक्सचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातनंतर ही घटना घडली. रात्री उशिरा पोलिस घटनास्थळी पोचले. त्याची नोंद घेण्याचे काम सुरू होते. तुकाराम सदाशिव खोचरे (वय ५५) व शहाजी सदाशिव खोचरे (५०) अशी मृत्यू भावांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बाबरमाची-सदाशिवगड येथील तुकाराम खोचरे आणि शहाजी खोचरे यांची शेतजमीन आहे. शेता नजीक त्यांची विहीर असून विहिरीजवळ फ्युजबॉक्स आहे. त्या फ्युजबॉक्समधून विहिरीला विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. शेतात काम असल्यामुळे तुकाराम व शहाजी खोचरे दोघेजण दुपारी घरातून शेतात जाण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. सायंकाळीही दोघे घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनीही फोनला प्रतिसाद दिला नाही. मोबाईलवर वारंवार संपर्क करूनही दोघे फोन उचलत नसल्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.

अखेर सायंकाळनंतर तुकाराम खोचरे यांचा मुलगा शेताकडे गेला. त्यावेळी तुकाराम व शहाजी दोघे जण विहिरीपासून काही अंतरावर असलेल्या फ्युज बॉक्सनजीक मृतावस्थेत पडल्याचे त्याला दिसले. त्याने तातडीने घटनेची माहिती कुटुंबीयांना तसेच ग्रामस्थांना दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. एन. पाटीलसह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. तत्पूर्वी वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी आले होते. त्यांनी तातडीने विभागातील वीज पुरवठा बंद केला. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT