Udayanraje Bhosale esakal
सातारा

उज्वल भविष्यासाठी पोस्ट विभागा‍च्या योजनांचा लाभ घ्‍या : उदयनराजे

सकाळ डिजिटल टीम

देशातील विविध भाषांत, क्षेत्रात टपाल खात्याने विश्वासार्ह सेवा दिलेली आहे.

सातारा : डाक विभागामार्फत (Satara Postal Department) प्रामुख्याने बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यातीलच सुकन्या समृध्दी ही योजना (Sukanya Samriddhi Yojana) प्रत्येक कन्यारत्न लाभलेल्या पालकांची बचतीबरोबरच भविष्यकालीन चिंता मिटवणारी योजना आहे. आपल्या कुटुंबातील दहा वर्षांच्या आतील प्रत्येक सुकन्येच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृध्दी योजनेचा स्वीकार प्रत्येक पालकाने करण्‍याचे आवाहन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केले.

खासदार भोसले यांनी सातारा पोस्ट विभागाच्या सिनिअर पोस्टमास्टर स्वाती दळवी यांच्याकडून पोस्‍ट खात्याच्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्‍याबाबतच्‍या पत्रकात म्‍हटले आहे की, टपाल खात्याने कार्यपध्दतीत बदल केला आहे. देशातील विविध भाषांत, क्षेत्रात टपाल खात्याने विश्वासार्ह सेवा दिलेली आहे.

टपाल खात्याची सुकन्या समृध्दी योजना सुरू असून, यात विविध रकमा गुंतवता येतात. या योजनेतून गुंतवणूकदारांना योग्‍य मोबदला, फायदा मिळतो. या योजनेचा जास्तीत जास्त कन्यारत्न पालकांनी घेऊन आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता मिटवावी, असेदेखील उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT