Udayanraje Bhosale wai ganpati ghat road cleaning mission satara Sakal
सातारा

Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजेंकडून वाईच्या गणपती घाटावर स्वच्छता मोहीम

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळा साजरा होत आहे

भद्रेश भाटे

वाई :- खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह येथील गणपती घाटावर स्वच्छता मोहिम राबविली. या प्रसंगी महागणपतीची आरती करण्यात आली. या निमित्ताने साक्षात श्री. गणेशाची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी आमदार मदन भोसले व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळा साजरा होत आहेत. यावेळी देशाच्या विविध भागांत व मंदिरात स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याप्रमाणे वाईच्या गणपती घाटावर खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह स्वच्छता मोहिम राबविली.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभीताई भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे व रोहिदास पिसाळ, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, शहराध्यक्ष विजय ढेकाणे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अनिल भिलारे, प्रतापगड उत्सव समितीच्या विजयाताई भोसले, बाजार समितीचे संचालक विवेक भोसले, ग्रामोद्योग आघाडीचे सचिन घाटगे, ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ शेलार, अजित वनारसे,

तेजस जमदाडे, भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सातारचे सुनील काटकर, काका धुमाळ, गीतांजली कदम, रंजना रावत, विनीत पाटील, पंकज चव्हाण या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, मंडल अधिकारी, पालिका आरोग्य निरीक्षक सागर सरतापे तसेच पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपाचे शहराध्यक्ष विजय ढेकाणे यांच्या घराच्या भिंतीवर कमळाचे चित्र रेखाटले. यावेळी ही शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT