सातारा

कास ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने मार्गी लावा; उदयनराजेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

गिरीश चव्हाण

सातारा : कास धरण परिसरातील ग्रामस्थांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली. भेटीनंतर झालेल्या संयुक्‍त बैठकीत उदयनराजेंनी कास परिसरातील ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्याच्या सूचना शासकीय अधिकाऱ्यांना केल्या. 

कास धरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असणारा कास परिसरातील गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली जाणार आहे. पाण्याचा फुगवठा वाढल्यानंतर रस्त्याबरोबरच कास येथील स्मशानभूमी व इतर प्राथमिक सुविधांचे स्थलांतर करावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आज कास, तसेच इतर गावांतील नागरिकांनी उदयनराजेंची भेट घेतली. या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर जलमंदिर येथे पाटबंधारे, बांधकाम, तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. या बैठकीसाठी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर आदी उपस्थित होते. 

ग्रामस्थांनी चर्चेदरम्यान धरणातील पाण्याचा वापर करण्याची परवानगी मिळावी, स्मशानभूमी नव्याने बांधून मिळावी, तसेच पावसाळ्यापूर्वी रिंगरोड व ऍप्रोच रोडचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर उदयनराजेंनी त्याबाबत काय कार्यवाही करता येईल, अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली. अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी तपासत ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यात अडचणी नसल्याचे उदयनराजेंना सांगितले. त्यानुसार या मागण्या विनाविलंब पूर्ण करण्याच्या सूचना उदयनराजेंनी अधिकाऱ्यांना केल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT