US Ambassador Visit to Tapola beauty of nature sunset  
सातारा

अमेरिकेच्या राजदूतांची तापोळ्याला भेट; परिसरातील निसर्गसौंदर्याने घातली भुरळ

भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकन राजदूत डेव्हिड रेंज व त्यांचा मुलगा नोव्हा हे तापोळा येथील निसर्गसौंदर्याने प्रभावित

सकाळ वृत्तसेवा

कास : सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकन राजदूत डेव्हिड रेंज व त्यांचा मुलगा नोव्हा हे तापोळा येथील निसर्गसौंदर्याने प्रभावित झाले. या निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी बराच वेळ घालवला.

कोयना धरणामुळे जावळी खोऱ्यातील कंदाटी, कोयना, सोळशी भागातील शिवसागर जलाशयामुळे येथील निसर्गसौंदर्य खुलून गेले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक देशी-विदेशी पर्यटक तापोळा-बामणोली, आरव, वासोटा किल्ला आदी भागाला भेट देतात. जागतिक वारसा लाभलेल्या कास पुष्प पठार व त्याच्या जोडीला असलेला बामणोली-तापोळा हे पर्यटनस्थळे सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.

अमेरिकेच्या राजदूतांनी बोटिंग व फोटोसेशन करून येथील निसर्गसौंदर्य व सनसेट कॅमेरात कैद केला. विशाल बोट क्लबचे अध्यक्ष सुभाष कारंडे व मान्यवरांनी त्यांचे भारतीय संस्कृतीनुसार स्वागत केले. महाबळेश्वर व प्रतापगड किल्ल्याची पाहणी करून अमेरिकेचे राजदूत मायदेशी जाणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी शिवसागर जलाशय व परिसराचे कौतुक केले. राज्याचे मंत्री व येथील भूमिपुत्र एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांनी पर्यटन विकास करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला यश मिळाल्याची भावना येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे, संतोष मालुसरे, राजू ढेबे व विठ्ठल धनावडे यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

SCROLL FOR NEXT