सातारा

खुशखबर! वेण्णालेक बोट क्‍लब पर्यटकांसाठी खुला

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : लॉकडाउनमुळे गेली आठ महिने बंद असलेला वेण्णालेक बोट क्‍लब पालिकेच्या वतीने पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. नौकाविहारासाठी आलेल्या पर्यटकांचे स्वागत पालिकेच्या वतीने फुलांचा वर्षाव करून करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह नगरसेवक व रोटरी क्‍लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
पर्यटकांचे पालिकेच्या वतीने फुले देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर फुलांचा वर्षावही करण्यात आला. या वेळी पालिकेच्या वतीने पेढे वाटण्यात आले. बोट क्‍लब सुरू करण्यापूर्वी पालिकेने परिसराची स्वच्छता करून तो परिसर निर्जंतुक करण्यात आला. सर्व बोटी साफ करून औषध फवारणी करण्यात आली. 

दोन पर्यटकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. प्रवेशद्वारावर पर्यटकांचे ऑक्‍सिजन व तापमान घेण्यात येऊन नोंद केली जात आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी मुख्याधिकारी पल्लवी पाटील, माजी नगराध्यक्ष युसूफ शेख व विमलताई पारठे, नगरसेवक कुमार शिंदे, संदीप साळुंखे, रवींद्र कुंभारदरे, शारदा ढाणक, विमल ओंबळे व श्रद्धा रोकडे आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT